WhatsApp: आता सहज शोधता येतील अगदी जुने मॅसेज, लवकरच येणार Exciting फिचर। Tech News
WhatsApp नवीन ' सर्च मॅसेज बाय डेट' फिचरवर काम करत आहे.
WhatsApp या नवीन फीचरसाठी 'कॅलेंडर बटण' देखील समाविष्ट करेल.
तारीख-आधारित सर्च फिचर संभाव्यतः वापरकर्त्यांच्या वेळेची बचत करणार आहे.
जगातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वेब क्लायंटसाठी नवीन ‘तारीखानुसार संदेश शोधा’ म्हणजेच ‘ सर्च मॅसेज बाय डेट’ फिचरवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स एका विशिष्ट तारखेला शेअर केलेले मॅसेज सहज शोधू शकतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
SurveyWhatsApp च्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणाऱ्या प्रसिद्ध टिपस्टर प्रकाशन WABetaInfo नुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वेबसाठी नवीन ‘सर्च मॅसेज बाय डेट’ फिचरवर काम करत आहे. वर सांगितल्याप्रमाणे, वापरकर्त्यांना विशिष्ट तारखेला शेअर केलेले संदेश शोधणे शक्य होईल.
WhatsApp is working on a search message by date feature for the web client!
— WABetaInfo (@WABetaInfo) October 15, 2023
WhatsApp is developing a new feature designed to make it easier for users to quickly search for messages shared on a specific date within their conversations.https://t.co/KAAKr90WcM pic.twitter.com/sE2fwJpRvV
सर्च मॅसेज बाय डेट फिचर
WhatsAppने या नवीन फीचरसाठी ‘कॅलेंडर बटण’ देखील समाविष्ट करणे, अपेक्षित आहे. या कॅलेंडर बटणाद्वारे, वापरकर्ते तारीख पिकर पॅनेल उघडण्यास सक्षम असतील, त्यानंतर त्यांना विशिष्ट तारखेला शेअर केलेले संदेश शोधणे अगदी सहज आणि सोपे होणार आहे. नव्या फिचरचा मुख्य फायदा म्हणजे यामध्ये संभाषणांमध्ये विशिष्ट संदेश शोधण्याची सुधारित क्षमता आहे.

हे तारीख-आधारित सर्च फिचर संभाव्यतः वापरकर्त्यांच्या वेळेची बचत करणार आहे. कारण ते वापरकर्त्यांना दीर्घ चॅट हिस्ट्री स्क्रोल न करता विशिष्ट तारखेपर्यंत संदेश अचूकपणे शोधण्याची परवानगी देईल. त्याबरोबरच, अलीकडेच असा अहवाल आला की, WhatsApp ने WhatsApp वेबसाठी नवीन ‘ग्रुप चॅट फिल्टर’ फीचरवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile