लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफोरण WhatsApp आपल्या यूजर्ससाठी रोज नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. दरम्यान, अलीकडेच एका नवीन फीचरबद्दल माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये यूजर्सना इन्स्टाग्राम स्टोरी सारख्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये म्युझिक जोडण्याची सुविधा मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. तर, आता मेटाने एक नवीन फिचर सादर केले आहे.
Also Read: आगामी Infinix Smart 9 HD ची भारतीय लाँच डेट जाहीर! Powerful फीचर्ससह लवकरच होणार दाखल
आम्ही तुम्हाला सांगतो की, या फीचर अंतर्गत यूजर्स आता WhatsApp स्टेटस थेट इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करू शकतील. जाणून घेऊयात या फीचरशी संबंधित सर्व माहिती-
Meta ने आपल्या नवीनतम ब्लॉग पोस्टद्वारे WhatsApp च्या नवीन फीचरबद्दल घोषणा केली आहे. या नवीन फीचरद्वारे व्हॉट्सॲप स्टेटस आता थेट इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करता येणार आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, आतापर्यंत ही सुविधा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर उपलब्ध होती. तुम्ही तुमच्या इन्स्टाग्रामवर एखादी स्टोरी शेअर करताच, ती स्टोरी तुमच्या फेसबुकवरही शेअर केली जाते.
मात्र, आता WhatsApp चे नाव देखील या इंटर-ॲप लिस्टमध्ये समाविष्ट होणार आहे. एवढेच नाही तर, ब्लॉग पोस्टमध्ये स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये व्हॉट्सॲपमध्ये एक नवीन अकाउंट सेंटर जोडण्यात येणार आहे. या अकाउंट सेंटरद्वारे तुम्ही इतर मेटा ॲप्स तुमच्या WhatsApp खात्याशी लिंक करू शकता, अशी माहिती पुढे आली आहे. यासोबतच तुम्हाला सेटिंगमध्ये ‘Who Can See My Status’ हा पर्याय देखील मिळणार आहे.
नव्या फिचरद्वारे तुम्हाला तुमची WhatsApp स्टोरी फेसबुकवर शेअर करायची असेल, तर फेसबुकसमोर दिसणारा टॉगल ऑन करा. त्याचप्रमाणे, तुम्हाला इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करायची असेल Instagram साठी टॉगल ऑन करा. जर तुम्हाला स्टोरीज दोन्ही ठिकाणी शेअर करायची असेल तर, दोन्ही टॉगल ऑन करावे लागेल. मात्र, लक्षात घ्या की, यासाठी तुम्हाला तुमचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट तुमच्या WhatsApp शी लिंक करावे लागेल.