WhatsApp Design Update: नव्या अपडेटमध्ये इन्स्टंट मेसेजिंग App चे बदलले स्वरूप, आता चॅटिंग करताना येणार आणखी मजा। Tech News 

WhatsApp Design Update: नव्या अपडेटमध्ये इन्स्टंट मेसेजिंग App चे बदलले स्वरूप, आता चॅटिंग करताना येणार आणखी मजा। Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp लाँच झाल्यापासून व्हॉट्सॲपच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

WhatsApp ने Android आणि iOS ॲप्ससाठी एक प्रमुख डिझाइन अपडेट आणले आहे.

Will Cathcart यांनी त्यांच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवर ॲपच्या डिझाइनमधील बदलांची घोषणा केली.

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स तर सादर करतच असतो. मात्र, आता WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या ॲपच्या डिझाइनमध्ये बदल केला आहे. इन्स्टंट मेसेजिंग ऍप लाँच झाल्यापासून व्हॉट्सॲपच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, आता कंपनीने पुन्हा एकदा Android आणि iOS या दोन्ही ॲप्सच्या डिझाइनमध्ये बदल केला आहे. अपडेटनंतर दोन्ही ठिकाणी ॲप जवळजवळ समान दिसेल. Meta ने WhatsApp Android आणि iOS ॲप्ससाठी एक प्रमुख डिझाइन अपडेट आणले आहे. चला तर मग बघुयात WhatsApp अपडेटमधील नवे बदल-

हे सुद्धा वाचा: Smartphone Tips: तुमच्या iPhone ची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी अगदी Important टिप्स, कंपनीने दिली माहिती। Tech News

WhatsApp Design अपडेट

WhatsApp चे बॉस Will Cathcart यांनी त्यांच्या अधिकृत WhatsApp चॅनेलवर ॲपच्या डिझाइनमधील बदलांची अधिकृतपणे घोषणा केली आहे. त्यांच्या पोस्टनुसार गेल्या काही वर्षांत फोनची डिझाईन खूप विकसित झाली आहे. परंतु त्यांनी नेहमी WhatsApp साधे, खाजगी आणि विश्वासार्ह ठेवण्यावर भर दिला आहे. पण आता WhatsApp इंटरफेसमध्ये अनेक नवीन अपडेट्स येत आहेत, जेणेकरून WhatsApp आणखी फ्रेश वाटेल.

WhatsApp Design मध्ये झालेले बदल

नवे कलर पॅलेट: WhatsApp Android आणि iOS ॲप्सवर अधिक ग्रीन एक्सपेरियन्स आणत आहे. कंपनीने दोन्ही ॲप्समध्ये न्यूट्रल कलर्सचा वापर वाढवला आहे.

अधिक डार्क मोड: WhatsApp ने नव्या अपडेटसह डार्क मोड थोडा आणखी डार्क केला आहे. जर WhatsApp च्या पोस्टवर विश्वास ठेवायचा असेल तर, लो लाईटमध्ये डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी हाय कॉन्ट्रास्ट आणि दीप टोनवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या कारणास्तव त्यास एक शेड डार्क करत आहेत.

WhatsApp's update makes navigation easier, brings 'darker dark mode': Details here
WhatsApp’s update makes navigation easier, brings ‘darker dark mode’: Details here

नेव्हिगेशन सोपे केले: अपडेटमुळे ॲपमध्ये नेव्हिगेशन देखील वापरकर्त्यांसाठी सोपे झाले आहे. WhatsApp ने Android साठी बॉटमला नेव्हिगेशन बार अपडेट केला आहे. टॅब अंतरावर ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून वापरकर्ते सहजपणे स्विच करू शकतील.

याव्यतिरिक्त, iOS वर, कंपनीने अपडेटेड अटॅचमेंट लेआउट सादर केले आहे. जे केवळ पर्यायांमध्ये प्रवेश सुलभ करत नाही तर Android आणि iOS ॲप्सवरील अनुभव देखील सुधारेल.

आयकॉन्स अपडेट: व्हॉट्सॲपने वापरण्यास सुलभ करण्यासाठी कंपनीने आयकॉन देखील अपडेट केले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, ते त्यांचे आयकॉन गोलाकार आणि अधोरेखित शैलीमध्ये अपडेट करत आहेत. त्याबरोबरच, नवीन आयकॉनोग्राफीशी जुळण्यासाठी ॲनिमेशन देखील जोडले गेले आहे.

चॅट पार्श्वभूमीत (बॅकग्राउंड) बदल: चॅट पार्श्वभूमी अधिक आकर्षक बनवण्यासाठी कंपनीने ओरिजनल डीफॉल्ट बॅकग्राउंड देखील रीफ्रेश केले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo