Sachet App: भारताचे आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 27 एप्रिल 2025 रोजी ‘मन की बात’ च्या 121 व्या भागात देशवासीयांना संबोधित केले आहे. या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी एका ऍपचा उल्लेख केला, त्यानंतर सर्वांना या ऍपबद्दल जाणून घ्यायचे आहे. या अॅपचे नाव SACHET App असे आहे. आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाने हे ऍप त्यांच्या फोनवर नक्कीच डाउनलोड करावे.
Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार cmf, Motorola चे जबरदस्त फोन्स!
देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती उपलब्ध व्हावी यासाठी सचेत ऍप हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. यामुळे देशाच्या विविध भागातील लोकांना महत्त्वाची माहिती सहज मिळू शकते. मात्र, हे ऍप नक्की आहे तरी काय? पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना ते डाउनलोड करण्याचे आवाहन का केले? जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-
सचेत अॅप हे राष्ट्रीय आपत्ती सूचना देणारे मोबाइल अॅप आहे. हे अॅप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) तयार केले आहे. सचेत अॅप वापरकर्त्यांना रिअल टाइम लोकेशनच्या आधारे नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी अलर्ट पाठवून सावध करते. पूर, चक्रीवादळ, त्सुनामी, वादळ, चक्रीवादळ आणि वीज पडण्यासारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी हे ऍप वापरकर्त्यांना सतर्क करते.
सविस्तर सांगायचे झाल्यास, केवळ नैसर्गिक आपत्तीच नाही तर याद्वारे वापरकर्ते हवामानाशी संबंधित माहिती देखील मिळवू शकतात. जर कोणत्याही ठिकाणी आपत्ती आली असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करावे किंवा काय करू नये याबद्दलची सर्व माहिती देखील हा ऍप देतो. हे अॅप GPS सिस्टमवर कार्य करेल. हे ऍप तुम्हाला तुमच्या सध्याच्या ठिकाणी जे काही घडते त्याबद्दल GPS द्वारे अलर्ट देईल.
सचेत अॅप केवळ इशारे देत नाही तर आपत्तीपूर्वी, दरम्यान आणि नंतर काय करावे, याबद्दल देखील माहिती देते. भूकंप असो, पूर असो, चक्रीवादळ असो किंवा उष्णतेची लाट असो, हे ऍप सोपे आणि व्यावहारिक सल्ले देईल, जे जीव वाचवण्यास मोठी मदत करतील.