WhatsApp Business: iOS वापरकर्त्यांना लवकरच मिळेल डू नॉट डिस्टर्ब मोड

Updated on 18-Jun-2022
HIGHLIGHTS

डू नॉट डिस्टर्ब मोड लवकरच Whatsapp वर येईल

iOS वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट येणार

नवीन अपडेट WhatsApp बिझनेस वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.

मेटा-मालकीचे मेसेजिंग ऍप  व्हॉट्सऍप एक नवीन ऍप प्रोग्रामिंग इंटरफेस (API) आणण्याची योजना करत आहे. ज्यामुळे डू नॉट डिस्टर्ब फिचर सक्रिय आहे की नाही हे ओळखता येईल. हे फिचर सर्वप्रथम iOS प्लॅटफॉर्मवर WhatsApp बिझनेस युजर्ससाठी आणले जाईल.

 हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F13 22 जून रोजी भारतात लाँच होईल, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

WABetaInfo च्या अहवालानुसार, आगामी फिचर प्रथम iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या WhatsApp Business वर आणले जात आहे. टेस्टफ्लाइटवर iOS साठी WhatsApp बीटावर पाहिले गेले की,  WhatsApp आता अजून एका iOS 15 API ला सपोर्ट करतो.

 हे सुद्धा वाचा: इंटरनेटशिवाय बघा चित्रपट आणि OTT कंटेंट, Video अजिबात थांबणार नाही

या API मध्ये आयफोनवर डू नॉट डिस्टर्ब पर्याय सक्षम आहे की नाही हे शोधण्याची क्षमता आहे. एका स्क्रिनशॉटद्वारे हे समजले की, जेव्हाही तुम्हाला व्हॉट्सऍप कॉल येतो आणि तुम्ही नोटिफिकेशन चुकवता कारण डू नॉट डिस्टर्ब मोड सक्षम आहे, तेव्हा तुम्हाला आता या कॉल्ससमोर एक लेबल दिसेल.

WhatsApp वरील कॉल हिस्ट्रीमध्ये, हे लेबल सूचित करेल की तुम्ही कॉल मिस केला कारण डिस्टर्ब मोड ऍक्टिव्ह होता. अहवालात असे म्हटले आहे की, ही माहिती किंवा कॉलरची माहिती व्हॉट्सऍपवर शेअर केली जात नाही, कारण ती फक्त ऍपच्या स्थानिक डेटाबेसमध्ये स्टोअर केली जाते. हे फिचर मिळवण्‍यासाठी, तुमच्‍या iPhone किमान iOS 15 सुरु असले पाहिजे कारण ते एक iOS 15 API आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :