apps
India-Pakistan मधील तणाव वाढता वाढता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहे. दरम्यान, पाकिस्तानने केलेले मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले आपण पाहिले आणि भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हा हल्ला कसा हाणून पाडला, हे देखील जगजाहीर आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने POK मध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. या तणावपूर्ण वातावरणात, कोणत्याही सद्य परिस्थितीची माहिती मिळविण्यासाठी आणि आपत्कालीन मदत मिळविण्यासाठी तुम्हाला या 5 ऍप्स आणि वेबसाइट्सबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.
Also Read: India Pakistan war: भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सायबर अटॅक! चुकूनही ‘Dance of the Hillary’ उघडू नका
होय, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला तसेच देशातील इतर निष्पाप लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही काही ऍप्स आणि वेबसाइट्सची मदत घेऊ शकता. वाचा सविस्तर-
112 India App हे सरकारच्या आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली (ERSS) चा भाग आहे. हे अॅप वापरकर्त्यांना एका क्लिकवर पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन आणि वैद्यकीय सेवांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देते. ते कॉल, SMS आणि ईमेलद्वारे मदत प्रदान करते. तसेच, राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक 112 शी एकत्रित केले आहे म्हणजेच तुम्ही अॅप वापरू शकता किंवा मदत मागण्यासाठी नंबर डायल करू शकता.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (ndrf.gov.in) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांच्या अधिकृत वेबसाइट आपत्ती, बचाव कार्य आणि सुरक्षा उपायांबद्दल रिअल-टाइम माहिती प्रदान करू शकतात. त्याबरोबरच, भूकंप, पूर किंवा संघर्षग्रस्त क्षेत्रांसारख्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, सार्वजनिक सूचना आणि अधिकृत सूचनांसाठी या वेबसाइट्स महत्त्वपूर्ण आहेत.
हे अॅप वापरकर्त्यांना गुन्ह्यांची तक्रार करण्यास, सुरक्षा सूचना प्राप्त करण्यास आणि स्थानिक आपत्कालीन क्रमांक शोधण्यास उपयुक्त आहे. गुन्हेगारी प्रतिबंध आणि वैयक्तिक सुरक्षिततेसाठी हे एक आवश्यक ऍप आहे.
रक्षा अॅप संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. या ऍपद्वारे आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्यांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना त्वरित सूचना देता येते. हे अॅप मोफत आहे आणि ते अँड्रॉइड तसेच iOS अॅप स्टोअर्सवरून डाउनलोड करता येईल. तसेच, यात GPS ट्रॅकिंग फीचर देखील आहे, जे अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.
संचार साथी पोर्टल (sancharsaathi.gov.in) चोरीला गेलेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक करण्याची सुविधा देते. तसेच, ID सह नोंदणीकृत सिम कार्ड सत्यापित करण्याची सुविधा देखील प्रदान करते. हे मोबाईलशी संबंधित फसवणूक रोखते आणि वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा सुनिश्चित करते.