WhatsApp वर पुढे पाठवलेले मॅसेज डिलीट करण्यासाठी महत्त्वाचे फिचर उपलब्ध
WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा आधार घ्यावा लागणार नाही.
WhatsApp वरील डिलीटेड मॅसेजेस वाचण्यासाठी सोपी प्रक्रिया
How to recover deleted messages on WhatsApp
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी दररोज नवीन अपग्रेड आणि नवीन फीचर्स आणत असतो. सुरुवातीला WhatsApp वर मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट करता येत नव्हता. मात्र, आता काही काळापूर्वी ही सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही प्रत्येकाच्या चॅटमधून मेसेज डिलीट करू शकता.
अनेकदा संपर्क तुम्हाला मॅसेजेस पाठवतात आणि लगेच डिलीट करतात. असे मॅसेजेस लोक गंमत म्हणून किंवा एखादी वैयक्तिक माहिती म्हणून देखील पाठवतात. जर तुमच्याकडून हे मॅसेजेस चुकले असतील आणि तुम्हाला ते वाचायचे असतील तर, डिलीट केलेले मेसेज तुम्ही एक सोपी युक्तीद्वारे सहज वाचू शकता.
लक्षात घ्या की, WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा आधार घ्यावा लागणार नाही. डिलीट केलेल्या मॅसेजची माहिती तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्येच मिळेल. पुढील सोपी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.
WhatsApp वरील डिलीटेड मॅसेजेस वाचण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनची ‘सेटिंग्ज’ मध्ये जावे लागेल.
सेटिंग्ज ऑप्शन्समध्ये तुम्हाला ‘Apps & Notification’ चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ‘Notification’ ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
आता येथे खाली स्क्रोल केल्यास तुम्हाला ‘Notification history’ चा पर्याय दिसेल.
‘Notification history’ वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक टॉगल उघडेल.
लक्षात घ्या की, बऱ्याच स्मार्टफोन्समध्ये ‘Notification history’ चा पर्याय थेट ‘Apps & Notification’ मध्ये उपलब्ध असतो.
आता डिलीटेड मॅसेज वाचण्यासाठी तुम्हाला ‘Notification history’ वर टॉगल करावे लागेल.
अखेर हे टॉगल ऑन केल्यानंतर तुम्ही येथे सर्व डिलीटेड मॅसेज सहज पाहू शकता.
या महत्त्वाच्या सेटिंगद्वारे तुम्ही डिलीटेड मॅसेज सहज बघू शकता. केवळ WhatsApp च नाही तर या विंडोमध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर येणारे सर्व नोटिफिकेशन्स बघू शकता. डिलीट केलेले मेसेज वाचण्याची ही एक अतिशय सोपी युक्ती आहे. या सोप्या युक्तीद्वारे तुम्हाला कुणालाही ‘डिलीटेड मॅसेजमध्ये काय लिहलं होत?’ असे विचारण्याची गरज येणार नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.