अभ्यास करताना काहीही अडचण येणार नाही, बघा विद्यार्थ्यांसाठी सर्वात Important असे ‘5’ Android Apps। Tech News

Updated on 10-Apr-2024
HIGHLIGHTS

विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अधिक सोयीस्कर व्हावे म्हणून अनेक महत्त्वाचे Apps उपलब्ध

Everstudent Student Planner विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात उपयुक्त आणि फायदेशीर App आहे.

dictionary.com हा विद्यार्थ्यांसाठी प्रथम क्रमांकाचा डिक्शनरी ॲप आहे

विद्यार्थ्यांचे अभ्यास करणे आता पूर्वीसारखे राहिले नाही. कोरोनामध्ये आलेल्या लोकडाऊनमुळे आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस आणि ऑनलाईन अभ्यासाची सवय झाली आहे. एवढेच नाही तर, गृहपाठ देखील आता विद्यार्थी फोनवर बघूनच करू लागले आहेत. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत किंवा कोणत्याही स्पर्धेच्या तयारीपासून ते संशोधन कार्यापर्यंत, विद्यार्थ्याचे जीवन कठीण आणि ऑनलाईनमध्ये व्यस्त झाले आहे. यासह, विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अधिक सोयीस्कर व्हावे म्हणून अनेक महत्त्वाचे Apps देखील उपलब्ध आहेत. या ऍप्ससह विद्यार्थी आपली महत्त्वाची कामे अगदी सहजरित्या करू शकतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची Android Apps-

हे सुद्धा वाचा: आगामी Affordable स्मार्टफोन Vivo T3X 5G ची भारतीय लाँच डेट Confirm! किंमत असेल 15000 रुपयांपेक्षा कमी। Tech News

Everstudent Student Planner

Everstudent Student Planner विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात उपयुक्त आणि फायदेशीर ॲप्सपैकी एक आहे. नावावरूनच समजते की, हे ॲप विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक कार्याचा मागोवा ठेवते. त्यानंतर त्यांना एका साध्या प्लॅनर इंटरफेसवर सादर करते. हे ॲप त्यांना सेमिस्टरचे ग्रुप तयार करण्यास आणि असाइनमेंट व्यवस्थापित करण्यात मदत करेल.

Evernote

आपणा सर्वांना माहितीच आहे की, आजच्या काळात विद्यार्थी जीवन खूप डिमांडिंग झाले आहे. Evernote हे तुमच्या Android डिव्हाइसवर असलेलं एक कार्यक्षम ॲप आहे. हे ॲप विद्यार्थ्यांना सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची आठवण करून देईल. त्याबरोबरच, यात इतर उपकरणांशी कनेक्ट करण्याचे फिचर देखील आहे. हे एक विनामूल्य Android ॲप आहे.

Dropbox

विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सर्व नोट्स एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या नोट्स थोड्या थोडक्या नसल्यामुळे त्या फोनमध्ये संग्रहित करणे कठीण होते, यासाठी Dropbox ऍप उपयुक्त ठरतो. हे ॲप सर्व नोट्स, असाइनमेंट्स, लेक्चर व्हिडिओ इ. संग्रहित करण्यासाठी सर्वोत्तम आहे. यासह तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या अभ्यासाचा डेटा बनवून ठेऊ शकता.

BenchPrep

हे ॲप एक परस्परसंवादी म्हणजेच इंटरॅक्टिव्ह लायब्ररी कोर्स आहे. हा कोर्स जो पदवी आणि व्यावसायिक परीक्षांच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. हे ॲप विशेषतः त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे, जे GMAT/LSAT/MCA किंवा इतर परीक्षांची तयारी करत आहेत. या कोर्समध्ये सांगितलेल्या विषयासंदर्भात संदर्भात सर्व सामग्री मिळेल.

dictionary.com

विद्यार्थ्यांसाठी हा प्रथम क्रमांकाचा डिक्शनरी ॲप आहे. या डिक्शनरी ऍपमध्ये तुम्हाला तब्बल 2000000 व्याख्या आणि समानार्थी शब्द मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना रोज नवीन शब्द जाणून घ्यायचे आहेत किंवा जे विद्यार्थी बोलण्याच्या क्षेत्रात किंवा शब्दांशी खेळण्याच्या क्षेत्रात आपले करियर घडवू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी हे ॲप अतिशय उपयुक्त आहे. त्याबरोबरच, शालेय अधिकाधिक विद्यार्थ्यांकडे तर हे ऍप असणे अगदी आवश्यक आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :