Smartphones Tips: DND वर असताना महत्त्वाचे कॉल मिस होणार नाहीत!
Smartphones Tips: महत्त्वाची कामे करत असताना आपण बरेचदा फोनमध्ये DND म्हणेजच Do Not Disturb हा मोड ऑन करतो. DND सुरु केल्याने कोणत्याही फोन कॉल, संदेश किंवा अलर्टची कोणतीही सूचना तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे काम करत असताना तुमचे लक्ष विचलित होणार नाही आणि तुम्ही तुमचे काम एकाग्रतेने पूर्ण करू शकता.
Also Read: Smartphones Tips: श्श! गुपचूप करा Call Recording, समोरच्याला पत्ताही लागणार नाही, जाणून घ्या कसे?
मात्र, आपल्याला माहितीच आहे की, कधीकधी आपत्कालीन परिस्थितीत हे फिचर आपल्यासाठी समस्येचे कारण बनते. कारण DND सुरु असताना, तुम्ही तुमच्या फोनच्या सर्व महत्त्वाच्या सूचना चुकवता. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, तुम्हाला DND मोडमध्ये सेटिंग करावी लागेल, ज्यानंतर DND सुरु असतानाही तुम्हाला महत्त्वाचे कॉल प्राप्त होतील. जाणून घेऊयात सविस्तर-
याव्यतिरिक्त, तुम्ही रिपीटेड कॉलसाठी रिंगकरता टॉगल देखील ऑन करू शकता. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, जर कोणी तुम्हाला सतत 3 पेक्षा जास्त वेळा कॉल करत असेल तर तुम्हाला त्याचे कॉल नोटिफिकेशन येईल. डू नॉट डिस्टर्ब मोडमध्ये उपलब्ध असलेल्या या फीचरबद्दल क्वचितंच लोकांना माहिती आहे. या गुप्त फीचर्सच्या मदतीने तुम्हाला DND मोडमध्येही महत्त्वाचे कॉल प्राप्त होतील. याशिवाय, इतर कॉल्स आणि नोटिफिकेशन्समुळे तुम्हाला त्रास देखील होणार नाही.