सध्या WhatsApp तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे.
WhatsApp वर तुम्ही व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलचाही आनंद घेऊ शकता.
जाणून घेऊयात WhatsApp कॉलसाठी रींगटोन बदलण्याची प्रक्रिया
लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर जवळपास प्रत्येक भारतीय करतो. जास्तकरून युजर्स WhatsAppद्वारे एकमेकांशी सहज कनेक्ट राहतात. ऑफिस कर्मचारी असो किंवा कॉलेजचे विद्यार्थी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी WhatsApp चा वापर करतात. एकंदरीत WhatsApp तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. चॅटिंगसोबतच लोक कॉलिंगसाठीही व्हॉट्सॲपचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.
होय, या WhatsApp वर तुम्ही व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलचाही आनंद घेऊ शकता. तुम्हालाही WhatsApp कॉल करायला आवडत असल्यास आम्ही तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगणार आहोत. जर तुम्हाला व्हॉट्सॲपच्या डिफॉल्ट कॉलर रिंगटोनचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ते तुमच्या आवडत्या गाण्यामध्ये देखील बदलू शकता. या सेटिंगनंतर, जेव्हाही तुम्हाला व्हॉट्सॲप कॉल येईल तेव्हा तुमचे आवडते गाणे फोनवर प्ले होईल. चला तर मग जाणून घेऊयात WhatsApp कॉलसाठी रींगटोन कशी बदलावी?
यानंतर तुम्हाला वरच्या डाव्या कोपऱ्यात थ्री डॉट मेनू पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता येथे तुम्हाला Settings पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. यानंतर Notifications पर्यायावर क्लिक करा.
येथे तुम्हाला खाली कॉल्सचा पर्याय दिसेल, या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अनेक WhatsApp रिंगटोन तुमच्या समोर दिसतील.
जर तुम्हाला तुमचे आवडते गाणे व्हॉट्सॲप कॉलसाठी रिंगटोन म्हणून सेट करायचे असेल, तर ते गाणे तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा.
अखेर WhatsApp रिंगटोन पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला येथे ऑप्शन्स दिसतील.
यानंतर तुम्ही Custom वर क्लिक करून आवडते गाणी निवडू शकता. यानंतर फोनच्या फाइल्स तुमच्या समोर ओपन होतील. तुम्हाला ते गाणे WhatsApp रिंगटोन म्हणून सेट करता येईल.
WhatsApp मध्ये असे अनेक सेटिंग्ज आहेत, ज्याचा वापर फार कमी लोक करतात. व्हॉट्सॲपच्या या रिंगटोन सेटिंगचे अनुसरण करून तुम्ही तुमचा WhatsApp कॉलिंग अनुभव आणखी मजेशीर करू शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.