घरून काम करणाऱ्या युजर्ससाठी आणि ऑनलाईन स्टडी क्लासेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला भरपूर डेटाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत कुठलाही अडथडा येऊ नये म्हणून JIO ने दीर्घकाळ वैधतेसह जास्त डेटा देणारे प्लॅन्स उपलब्ध करून दिला आहेत. जेणेकरून तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज उरणार नाही. हे प्लॅन्स बऱ्याच बेनिफिट्ससह येतात, या प्लॅन्सची किमंत बेनिफिट्स बघता किफायतशीर असते. चला तर मग बघुयात डेली भरपूर डेटा देणारे आणि वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स –
या विभागात सर्वात स्वस्त प्लॅन 2545 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 1.5 GB डेटा मिळतो. यासह अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. हा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, यामध्ये दररोज 100 SMS देखील मिळतात.
JIO च्या 2,879 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा मिळतो. हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यासह वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्ये देखील अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत.
JIO च्या 2,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एका वर्षापेक्षा जास्त दिवसांची वैधता दिली जाते. हा प्लॅनमध्ये एकूण 388 दिवसांची वैधता दिली जात आहे. यामध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. तसेच, वरील सर्व प्लॅन्सप्रमाणे या प्लॅनमध्ये देखील तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील.