Airtel प्रत्येक ग्राहकाच्या सोयीनुसार अनेक प्लॅन्स ऑफर करते. बजेटमध्ये येणारे प्लॅन्स, महागडे प्लॅन्स, दीर्घकालीन वैधतेसह येणारे प्लॅन्स, OTT बेनिफिट्ससह येणारे प्लॅन्स इ. अनेक प्रकारचे प्लॅन्स कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला Airtel च्या 100 रुपयांच्या अंतर्गत येणाऱ्या प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.
19 रुपयांचा प्लॅन : 1 GB डेटासह 19 रुपयांचा प्लॅन 1 दिवसाच्या वैधतेसह उपलब्ध आहे.
29 रुपयांचा प्लॅन : 1 दिवसाच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये 2GB डेटा उपलब्ध आहे.
49 रुपयांचा प्लॅन : यामध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह संपूर्ण 6GB डेटाचा लाभ उपलब्ध आहे. हा प्लॅन कंपनीने नुकताच लाँच केला आहे.
58 रुपयांचा प्रीपेड प्लॅन : या प्लॅनसह 3GB डेटाचा लाभ मिळत आहे. या प्लॅनची वैधता तुमच्या विद्यमान प्लॅनइतकी असणार आहे.
65 रुपयांचा प्लॅन : प्लॅनसह यूजर्सला 4GB डेटा दिला जात आहे. वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनची वैधता तुमच्या विद्यमान प्लॅनइतकी असेल.
65 रुपयांचा प्लॅन T20 डेटा पॅक : यासोबत तुम्हाला 4GB डेटाचा लाभ मिळेल. याची वैधता विद्यमान प्लॅनइतकीच असेल.
98 रुपयांचा प्लॅन : यामध्ये 5GB डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता सध्याच्या प्लॅनसारखीच आहे. यामध्ये विंक म्युझिक प्रीमियमचा लाभ देखील आहे.