Google Pixel Fold कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन म्हणून I/O 2023 दरम्यान सादर करण्यात आला आहे. गुगलचा दावा आहे की, हा बाजारातील सर्वात थिन फोल्डेबल फोनपैकी एक आहे. हे स्मार्टफोन Galaxy Fold4 प्रमाणे डिझाइन केले गेले आहे आणि ते पुस्तकाप्रमाणे उघडते आणि बंद होते. Google Pixel ची किंमत USD 1,799 म्हणजेच अंदाजे रुपये 1,47,000 आहे.
Google Pixel Fold मध्ये 5.8-इंच कव्हर डिस्प्ले आणि 7.6-इंच लांबीची फ्लेक्सिबल स्क्रीन आहे. दोन्ही OLED पॅनेल आहेत, त्यासोबत 120Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Tensor G2 चिपसेट फोल्डेबल फोनमध्ये उपलब्ध आहे यामध्ये 12GB रॅम 256GB/512GB स्टोरेजसह मिळणार आहे. फोनमध्ये Android 13 मिलत आहे, परंतु वर्षाच्या अखेरीस Android 14 वर अपडेट केला जाईल.
फोनमध्ये 4,800mAh बॅटरी आहे, जी 30W चार्जिंगला सपोर्ट करते.
डिव्हाइसमध्ये दोन 8.3MP चे कॅमेरे आहेत. तुम्हाला 48MP + 10.8MP + 10.8MP असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळत आहे.