जूनमध्ये, सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेले चित्रपट आणि वेब सीरिज OTT वर दाखल होणार आहेत. Prime video, Netflix, Disney plus Hotstar आणि JioCinema या प्लॅटफॉर्म वर या महिन्यात नवा कंटेंट रिलीज होणार आहे. चला तर मग प्रेक्षकांनो जूनमध्ये प्रदर्शित होणार्या एकापेक्षा एक चित्रपट आणि सिरीजबद्दल जाणून घेऊयात.
शाहिद कपूर त्याच्या आगामी 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात ऍक्शन मोडमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 9 जून रोजी OTT वर रिलीज होईल. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज तुम्ही या व्हीडिओमध्ये बघू शकता.
हा चित्रपट मागील वर्षी थिएटरवर खूप गाजला होता. चित्रपटगृहात यश मिळवल्यानंतर हा हॉलिवूड चित्रपट OTT वर 7 जूनला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर' आता भारतात Disney+ Hotstar वर स्ट्रीम होत आहे. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट अन्य चार भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.
द नाईट मॅनेजर या वेब सीरिजच्या पहिलय सीझनच्या लोकप्रियतेनंतर आता त्याचा दुसरा सीझन येत आहे. चाहत्यांची प्रतीक्षा 30 जून रोजी संपणार आहे. यामध्ये अनिल कपूर एका शस्त्र विक्रेत्याची भूमिका साकारत आहे. सिरीज Disney+ Hotstar वर रिलीज होईल.