हा स्कूटर वापरकर्ते स्मार्टफोन अॅपनेसुद्धा नियंत्रित करु शकतात. ह्याचा वेग १६ किलोमीटर प्रति तास आहे आणि ह्याचे वजन १२.८ किलो आहे. ह्या स्कूटरची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर २२ किलोमीटर चालू शकते.
श्याओमीने एक स्वयंचलित तोल सावरणारा इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केला आहे. हा बॅटरीवर चालतो. ह्या नवीन स्कूटरचे नाव आहे नीनेबोट मिनी. आणि ह्याची किंमत आहे २०,५०० रुपये. मात्र हा बाजारात कधीपासून उपलब्ध होईल याबाबत अजून कोणतीच माहिती मिळाली नाही.
Survey
✅ Thank you for completing the survey!
श्याओमीने हा सेल्फ बँलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर चायनीज ट्रान्सपोर्टेशन रोबोटिक्स फर्म नीनेबोटसोबत मिळून बनवला आहे आणि त्याचबरोबर कंपनीने दुचाकी विभागात पाऊल ठेवले आहे.
हा स्कूटर स्वत:च्या वैशिष्ट्यांविषयी थोडा वेगळा आहे. ह्याचा वेग १६ किलोमीटर प्रति तास आहे आणि ह्याचे वजन १२.८ किलो आहे. ह्या स्कूटरची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर २२ किलोमीटर चालू शकते. हा स्कूटर पायाने चालवू शकता आणि थांबवूही शकता. नीनेबोट मिनी काळ्या आणि पांढ-या अशा रंगात उपलब्ध आहे.
ह्या कार्यक्रमात कंपनीने आपले अजून काही प्रोडक्ट्ससुद्धा लाँच केले आहेत. ज्यात Mi TV3, सबवूफर आणि ब्लूटुथवर चालणा-या रिमोट कंट्रोलचासुद्धा समावेश आहे.