हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये

HIGHLIGHTS

ह्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचला Grisogono ने डिझाईन केले आहे आणि हे बनविण्यासाठी सोने आणि हि-यांचा वापर केला गेला आहे. ह्या वॉचचा पट्टा काळ्या रंगाच्या चामड्याने बनला आहे.

हिरेजडित असलेल्या सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचची किंमत आहे १० लाख रुपये

सॅमसंग गियर S2 चे नवीन व्हर्जन लाँच झाले आहे. ह्या व्हर्जनची किंमत १० लाख रुपये ($15,000)  आहे. ह्या स्मार्टवॉचला Grisogono ने डिझाईन केले आहे आणि हे बनविण्यासाठी सोने आणि हि-यांचा वापर केला गेला आहे. ह्या वॉचचा पट्टा काळ्या रंगाच्या चामड्याने  बनला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ही माहिती जर्मन वेबसाइट, ऑल अबाउट सॅमसंगने दिली आहे. हे स्मार्टवॉच ह्या वर्षी सॅमसंग आणि De Grisogongo खाजगी चॅनल्सच्या माध्यमातून उपलब्ध होईल. तथापि, ह्या स्मार्टवॉचचे लुक थोडे वेगळे आहे, ह्यात ते सर्व फीचर्स आहेत, जे एका सामान्य सॅमसंग गियर S2 स्मार्टवॉचमध्ये मिळतात.

 

तसेच ह्या स्मार्टवॉचच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1.2 इंचाची सर्क्युलर डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 360×360 पिक्सेल आहे. ह्यात 1GHz ड्यूल कोर प्रोसेसर आणि 512MB चे रॅमसुद्धा मिळत आहे. हा डिवाइस 4GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो.

 

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ब्लूटुथ, वायफाय आणि NFC दिले गेले आहे. सॅमसंग गियर S2 धूळ आणि पाण्यापासून संरक्षित आहे. ह्यात 250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

 

टायजन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित गियर S2 स्मार्टवॉचचे प्रदर्शन सॅमसंगने IFA 2015 दरम्यान केले होते.

 

हेदेखील वाचा – शाओमी लाँच केला 3GB रॅम असलेला रेडमी 3 प्रो

हेदेखील वाचा – Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची पहिली झलक

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo