Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची पहिली झलक

ने Team Digit | अपडेट Apr 01 2016
Slide 1 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

भारतीय ब्रँड Smartron ने आपली सुरुवात २०१४ मध्ये केली होती आणि दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कंपनीने आपले दोन नवीन प्रोडक्ट्स बाजारात आणले आहेत. कंपनी एक हायब्रिड विंडोज टॅबलेट आणि एक अॅनड्रॉईड स्मार्टफोन घेऊन आली आहे. तथापि, कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोन tPhone ला पुढील महिन्यात लाँच करेल. ह्याची बुकिंग १८ एप्रिलपासून होऊ शकते. तर टॅबलेट tBook गॅजेट्स360 वर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. ह्याची किंमत ३९,९९९ रुपये आहे. हा ८ एप्रिलपासून खरेदी केला जाऊ शकतो. चला तर मग पाहूयात काय आहे ह्या टॅबलेटची खास वैशिष्ट्ये…

Slide 2 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

सर्वात आधी जाणून घेऊयात याची ठळक वैशिष्ट्ये.

प्रोसेसर: इंटेल एटम M5Y10c
रॅम: 4GB DDR3
ऑपरेटिंग सिस्टम: विंडोज 10 होम/प्रो कीबोर्डसह

Slide 3 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

ह्यात 12.2 इंचाची IPS डिस्प्ले 2560x1600 पिक्सेलसह मिळते. ह्यात आपल्याला 64-बिटचे इंटेल कोर M प्रोसेसर मिळत आहे. ह्याचे व्ह्यूविंग अँगल्ससुद्धा चांगले आहेत आणि ह्यावर रंगसुद्धा चांगले दिसतात. हा टॅबलेट टच इनपुटसह येतो.

Slide 4 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

Smartron ने आपल्या सर्व प्रोडक्ट्समध्ये एक खूपच खास फीचरचा समावेश केला आहे, जो आहे IoT केंद्रित हब. ह्याचे सर्व डिवायसेस IoT केंद्रित हबसह येतील. ज्याच्या मदतीने यूजर्स अगदी सहजपणे ह्या डिवाइसशी जोडलेल्या प्रोडक्टवर नियंत्रण करु शकतील. तसे कंपनी लवकरच आपले IoT प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. ह्या हबच्या मदतीने थर्ड पार्टी प्रोडक्ट्सचासुद्धा वापर केला जाईल. हे हब कंपनीच्या प्रोडक्टमध्ये प्री-इन्स्टॉल्ड येतील.

Slide 5 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

ह्या टॅबलेटसह कीबोर्ड कव्हरसुद्धा दिले आहे ज्याच्यामुळे ह्या डिवाइसशी पोगो पिंसच्या माध्यमातून कनेक्ट केले जाऊ शकते. आम्ही ह्या कीबोर्डला वापरुन पाहिले आणि आम्हाला हा कीबोर्ड चांगला वाटला. तथापि, ह्याविषयी आम्ही आमच्या रिव्ह्यूमध्येच सांगू.

Slide 6 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

tBook टॅबलेट मॅग्नेशियम+अॅल्युमिनियम बॉडीने बनलेला आहे. तथापि, ह्याची बिल्ड गुणवत्ता उत्कृष्ट आहे. मात्र हा डिवाइस थोडा जड आहे. ह्याचे डिझाईन चांगले आहे आणि हे लोकांना नक्की आवडेल.

Slide 7 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

tBook लॅपटॉपसारखेही वापरु शकतो आणि हेच ह्याच्या डिझाईनचे वैशिष्ट्य आहे. हा एक किकस्टँडसह येतो. ह्या किकस्टँडच्या माध्यमातून ह्या डिवाइसला एख डेस्कवर ठेवून अगदी सहजपणे वापरु शकतो.

Slide 8 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

ह्या डिवाइसमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्या कॅमे-याने तुम्ही HD व्हिडियोजही काढू शकता.

Slide 9 - Smartron tBook: पाहा ह्या विंडोज टॅबलेटची  पहिली झलक

हा डिवाइस उत्कृष्ट आहे. कंपनीने ह्यात सर्व प्रकारचे महत्त्वाचे पोर्ट्स दिले गेले आहे. ह्या डिवाइसमध्ये उजव्या बाजूला मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट, दोन USB 3.0 पोर्ट्स, एक मायक्रो HDMI पोर्ट आणि एक USB type-C 3.0 पोर्ट दिला आहे. डाव्या बाजूला 3.5mm हेडफोन-मायक्रोफोन कॉम्बो जॅक दिला आहे.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status