सोनी प्लेस्टेशन VR: 399 डॉलर किंमतीसह ऑक्टोबरमध्ये होणार लाँच

सोनी प्लेस्टेशन VR: 399 डॉलर किंमतीसह ऑक्टोबरमध्ये होणार लाँच
HIGHLIGHTS

जर इतर VR च्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, ऑकलस रिफ्ट आणि HTC Vive VR ची किंमत क्रमश: 599.99 आणि 799 डॉलर आहे.

सोनीने अशी घोषणा केली आहे की, तो आपला पुढील प्लेस्टेशन VR ह्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करेल आणि ह्याची किंमत 399 डॉलर असेल. ह्याचाच अर्थ हा जवळपास २६,९०० रुपयापर्यंत असू शकतो. ह्याच्याव्यतिरिक्त इतर VR च्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, ऑकलस रिफ्ट आणि HTC Vive VR ची किंमत क्रमश: 599.99 आणि 799 डॉलर आहे. कंपनीने अशी घोषणा केली आहे की, ह्या डिवाइसचा सर्व कंटेंट रिटेल पॅकेजमध्ये असेल. हा डिवाइस प्लेस्टेशन 4 आणि ड्यूलशॉक 4 किंवा प्लेस्टेशन मूवला कडक टक्कर देणार आहे.

 

सोनीने सांगितले की, जवळपास २३० च्या जवळपास डेव्हलपर्स ह्या प्लेस्टेशन VR साठी कंटेंट बनवायला लागले आहेत आणि असे सांगितले जातय की, ऑक्टोबरमध्ये लाँचवेळी ह्यात आपल्याला जवळपास ५० गेम्स मिळणार आहेत. त्याशिवाय कंपनीने अशीही घोषणा केली आहे की, प्लेरुमVR सुद्धा ह्यासोबत मोफत मिळणार आहे. ह्यात 6 गेम्स असतील.

 

हा डिवाइस 5.7 इंचाच्या OLED डिस्प्ले ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेलने सुसज्ज आहे. ह्यात आपल्याला 100 डिग्री फील्ड व्ह्यू आणि 9 LED ट्रॅकर्स मिळत आहे, जो आपल्याल 360 डिग्री ट्रॅकिंग देतो.

 

 

हेदेखील वाचा – वनप्लस 2 ची किंमत झाली कमी, २००० रुपयांची झाली घट

हेदेखील वाचा – पुन्हा एकदा अपडेट झाले व्हॉट्सअॅप, मिळणार हे नवीन फीचर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo