Free! Samsung च्या Galaxy Watch Ultra वर अविश्वसनीय ऑफर, फक्त एकच अट आणि महागडी वॉच मोफत
Samsung ने 'Walk-a-thon India' अशा नव्या चॅलेंजची घोषणा केली.
हे चॅलेंज आधीच लाइव्ह आहे, जो येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील.
वापरकर्त्यांना आव्हान कालावधीत 2,00,000 स्टेप्स पूर्ण करावे लागतील
साऊथ कोरीयाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने ‘Walk-a-thon India’ अशा नव्या चॅलेंजची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही एक अनोखी मोहीम आहे, जी केवळ देशातील Samsung Health ऍप वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आली आहे. ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, एका महिन्यात जर तुम्ही 2,00,000 पावले चालण्याचे आव्हान पूर्ण केले. तर, सहभागींना Samsung Galaxy Watch Ultra जिंकण्याची संधी मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात ऑफर्सचे सविस्तर तपशील-
SurveyAlso Read: OnePlus 13 mini: छोटा पण Powerful स्मार्टफोन लवकरच होणार लाँच! लाँच टाइमलाईन आणि फीचर्स Leak
Samsung चे ‘Walk-a-thon India’ चॅलेंज
‘वॉक-अ-थॉन इंडिया’ चॅलेंज देशातील सर्व सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. जे सॅमसंग हेल्थ ऍप ऍक्सेस करू शकतात. हे चॅलेंज आधीच लाइव्ह आहे, जो येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. बक्षीसासाठी पात्र होण्यासाठी, वापरकर्त्यांना आव्हान कालावधीत 2,00,000 स्टेप्स पूर्ण करावे लागतील आणि #WalkathonIndia हॅशटॅग वापरून त्यांचे स्क्रीनशॉट पोस्ट करावे लागतील. सहभागींपैकी, कोणत्याही तीन विजेत्यांना निवडून सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा बक्षिस दिले जाईल, जी प्रीमियम स्मार्टवॉच आहे. लक्षात घ्या की, या स्मार्टवॉचची किंमत 59,999 रुपये आहे.

या चॅलेंजमध्ये भाग कसा घ्यायचा?
आम्ही तुम्हाला सांगतो की, वॉक-अ-थॉन चॅलेंज भारतातील सर्व सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी लाईव्ह आहे. चालेंजमध्ये सामील होण्यासाठी, सॅमसंग हेल्थ ऍपवर जा आणि ‘Together’ सेक्शनवर जा. येथे, तुम्हाला वॉक-अ-थॉन इंडिया चॅलेंजमध्ये प्रवेश करावा लागेल आणि तुमचे स्टेप्स ट्रॅक करावे लागतील. 2,00,000 स्टेप्स गाठल्यानंतर, लकी ड्रॉसाठी पात्र होण्यासाठी #WalkathonIndia सह सॅमसंग मेंबर्स ऍपवर पूर्णतेचा स्क्रीनशॉट पोस्ट करा. यानंतर, तीन भाग्यवान सहभागी गॅलेक्सी वॉच अल्ट्रा जिंकतील.
Samsung Galaxy Watch Ultra
सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रामध्ये 1.5 इंच लांबीचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. लक्षात घ्या की, यात टायटॅनियम ग्रेड 4 फ्रेम आणि 10 ATM वॉटर रेझिस्टन्स आहे. ही स्मार्टवॉच W1000 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जी 2GB मेमरी आणि 32GB नेटिव्ह स्टोरेजसह जोडलेले आहे. त्याबरोबरच, यात स्टेप्स काउंटर, हार्ट रेट आणि SPO2 मॉनिटरिंग सारखी फीचर्स आहेत. तसेच, ही वॉच बीएमआय, रक्तदाब ईसीजी आणि AI-चालित अंतर्दृष्टी सारखे प्रगत मेट्रिक्स देखील देते, ज्यामध्ये एनर्जी स्कोअरचा देखील समावेश आहे.
याव्यतिरिक्त, ही वॉच सायकलिंगसाठी AI-पॉवर्ड फंक्शनल थ्रेशोल्ड पॉवर (एफटीपी) मेट्रिक्स आणि नवीन मल्टी-स्पोर्ट टाइल देते. या स्मार्टवॉचमध्ये 590mAh बॅटरी आहे. सुरक्षिततेसाठी, स्मार्टवॉचमध्ये आपत्कालीन परिस्थिती, फॉल डिटेक्शन आणि विशिष्ट संपर्कांना अलर्ट करण्यासाठी आपत्कालीन SOS साठी 86-डेसिबल सायरन आहे. ही वॉच WearOS 5 वर कार्य करेल आणि गुगल प्ले सर्व्हिसेस, थर्ड-पार्टी ऍप्स आणि इतरांना सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.3, एलटीई, एनएफसी, ड्युअल-बँड वाय-फाय आणि GPS यांचा समावेश आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile