Realme Watch 3 ची आज पहिली सेल, कॉलिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध

HIGHLIGHTS

Realme Watch 3 ची पहिली विक्री आज

दुपारी 2 वाजल्यापासून कंपनी वेबसाइट आणि Flipkart वर उपलब्ध

स्मार्टवॉचमध्ये 110 फिटनेस मोड मिळतील

Realme Watch 3 ची आज पहिली सेल, कॉलिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स उपलब्ध

जर तुम्ही परवडणारे कॉलिंग स्मार्टवॉचच्या शोधत असाल, तर Realme Watch 3 ची भारतात पहिली विक्री आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. Flipkart व्यतिरिक्त, Realme Watch 3 आज दुपारी 2 वाजल्यापासून कंपनीच्या वेबसाइट आणि रिटेल स्टोअरवरून खरेदी करता येईल. Realme Watch 3 मध्ये 1.8 इंच लांबीचा मोठा कलरफुल डिस्प्ले आहे. याशिवाय रियलमीच्या या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे. Realme Watch 3 च्या बॅटरी लाइफबाबत सात दिवसांच्या बॅकअपचा दावा करण्यात आला आहे. याला वॉटर रेझिस्टंटसाठी IP68 रेटिंग देखील मिळाले आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : भारतात Samsung Galaxy Fold 4, Galaxy Flip 4 ची प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या सविस्तर तपशील

Realme Watch 3 चे फीचर्स

Realme Watch 3 मध्ये 1.8-इंच लांबीचा TFT-LCD डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 240×286 पिक्सेल आणि ब्राइटनेस 500 nits आहे. यासोबतच उजवीकडे एक बटन दिले आहे, जे नेव्हिगेशनसाठी वापरले जाईल. Realme Watch 3 सह 110 पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध असतील. रिअ‍लमीचे हे स्मार्टवॉच अँड्रॉइड आणि IOS या दोन्ही उपकरणांसोबत वापरता येईल.

realme watch 3 first sale

Realme Watch 3 सह कॉलिंगसाठी सपोर्ट देखील आहे. चांगल्या कॉलिंगसाठी यात AI आधारित नॉईज कॅन्सलेशन देखील आहे. या स्मार्टवॉचमध्ये 110 फिटनेस मोड आहेत. यात ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी SpO2 सेन्सर देखील आहे. हार्ट रेट मॉनिटरिंग व्यतिरिक्त या वॉचमध्ये स्टेप काउंटर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग आहे. याला वॉटरप्रूफसाठी IP68 रेटिंग मिळाली आहे. या उपकरणांच्या बॅटरीबाबत सात दिवसांच्या बॅकअपचा दावा आहे.

Realme watch 3 किंमत

Realme Watch 3 ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र लॉन्चिंग ऑफर अंतर्गत, 2,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. Realme Watch 3 ब्लॅक आणि ग्रे कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. लॉन्चिंग  ऑफर अंतर्गत, Axis Bank कार्ड पेमेंटवर 5 % सूट देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo