राउंड डायल आकर्षक लुकसह Pebble चे नवीन ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच लाँच, प्री-बुकिंगवर 1000 रुपयांची सूट

राउंड डायल आकर्षक लुकसह Pebble चे नवीन ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच लाँच, प्री-बुकिंगवर 1000 रुपयांची सूट
HIGHLIGHTS

Pebble Cosmos Vault स्मार्टवॉच बाजारात लाँच

ही वॉच प्री-बुकिंग ऑफरमध्ये 2,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध

हे एक फ्लॅट स्क्रीन स्मार्टवॉच आहे, जी ऑल्वेज ऑन डिस्प्लेसह येते.

Pebble चे नवीन स्मार्टवॉच Cosmos Vault भारतात लाँच करण्यात आले आहे. ही वॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि Myntra वरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही वॉच सुरुवातीच्या प्री-बुकिंग ऑफरमध्ये 2,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.  जाणून घेऊयात सविस्तर माहिती – 

Pebble Cosmos Vault ची किमंत 

Pebble Cosmos Vault ची मूळ किंमत 3,699 रुपये आहे. प्री-बुकिंगसह वॉच 1 हजार रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येणार आहे. ऑफर संपल्यावर ही वॉच 3,699 रुपयांना मिळेल. ही वॉच रोझ गोल्ड, ऑब्सिडियन ब्लॅक आणि क्लासिक सिल्व्हर कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करता येणार आहे. सिंगल चार्जवर ही वॉच 5-7 दिवसांपर्यंत वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे. येथून खरेदी करा 

Pebble Cosmos Vault ची विशेषता 

ही स्मार्टवॉच AMOLED डिस्प्लेसह 1.43 इंच लांबीच्या स्पोर्टिंग डायल येते. हे एक फ्लॅट स्क्रीन स्मार्टवॉच आहे. यात ऑल्वेज ऑन डिस्प्ले आणि डिजिटल क्राउन देखील मिळेल. यासोबत म्युझिक आणि कॅमेरा कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 

याव्यतिरिक्त, यात ब्लूटूथ कॉलिंग, डायल बॅक, फोन कॉल रिसीव्ह, कॉल रिमाइंडर, SMS रिमाइंडर आणि सोशल मीडिया इ. स्मार्ट नोटिफिकेशन अलर्ट फिचर देखील आहे. त्याबरोबरच, वॉचमध्ये AI व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. यासह तुम्ही व्हॉइस कमांड देऊन वॉच वापरू शकता. वॉचमध्ये 240 mAh बॅटरी मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo