Amazing! तब्बल 100 तासांच्या बॅटरी लाईफसह OnePlus Watch 2 भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवी स्मार्टवॉच? Tech News 

Amazing! तब्बल 100 तासांच्या बॅटरी लाईफसह OnePlus Watch 2 भारतात लाँच, तुमच्या बजेटमध्ये बसेल का नवी स्मार्टवॉच? Tech News 
HIGHLIGHTS

अप्रतिम OnePlus Watch 2 भारतात लाँच करण्यात आली आहे.

लाँच ऑफरअंतर्गत या वॉचवर तुम्हाला बँक कार्डतर्फे 2000 रुपयांची सूट मिळेल.

ही वॉच स्मार्ट मोडमध्ये एका चार्जवर 100 तासांपर्यंत बॅकअप देते.

लेटेस्ट OnePlus Watch 2 भारतात लाँच करण्यात आली आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, विशेषतः या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग समर्थित आहे, ज्याद्वारे तुम्ही थेट स्मार्टवॉचवरून कॉल करण्यास सक्षम असाल. या वॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. पाण्याच्या संरक्षणासाठी या उपकरणासह IP68 रेटिंग देण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात लेटेस्ट स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: How to: चिंता मिटली! घरबसल्या तुमचे Aadhar कार्ड लॉक करा, ‘अशा’ प्रकारे कुणालाही दुरुपयोग करता येणार नाही। Tech News

OnePlus Watch 2 ची भारतीय किंमत

कंपनीने OnePlus Watch 2 ची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये ठेवली आहे. या वॉचवर लाँच ऑफर देखील उपलब्ध आहे. होय, ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास, तुम्हाला 2000 रुपयांची इंस्टंट डिस्काउंट ऑफर दिली जाईल. या वॉचमध्ये दोन ब्लॅक स्टील आणि रेडियंट स्टील हे दोन कलर ऑप्शन्स दिले जातील. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टवॉचची सेल भारतात 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.

OnePlus Watch 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Watch 2 मध्ये 1.43 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्टेनलेस स्टील चेसिस आहे. ही स्मार्टवॉच Qualcomm Snapdragon W5 Gen 1 चिपसेटसह येते, ज्यामध्ये 2GB रॅम आणि तब्बल 32GB स्टोरेज आहे. तसेच, यात NFC आणि GPS साठी सपोर्ट आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग समर्थित आहे. स्मार्टवॉच Wear OS 4 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल. वॉचमध्ये अनेक आरोग्यविषय फीचर्स देण्यात आले आहेत. वॉचमध्ये 100 हुन अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत.

oneplus watch 2 launched in india

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या वॉचमध्ये 500mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, ही वॉच स्मार्ट मोडमध्ये एका चार्जवर 100 तासांपर्यंत बॅकअप देते. तर, हेवी युजसह तुम्हाला 48 तासांपर्यंत वापर करता येईल. त्याबरोबरच, हे वॉच पॉवर सेव्हर मोडवर 12 दिवस चालेल. वॉचमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे 60 मिनिटांत ही वॉच 0 ते 100% चार्ज होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo