ब्लूटूथ कॉलिंगसह Noise ColorFit Pro 5 स्मार्टवॉच Launch, पहिल्या सेलमध्ये 500 रुपयांची सूट मिळवा। Tech News  

ब्लूटूथ कॉलिंगसह Noise ColorFit Pro 5 स्मार्टवॉच Launch, पहिल्या सेलमध्ये 500 रुपयांची सूट मिळवा। Tech News  
HIGHLIGHTS

कंपनीचे नवीन उपकरण Noise ColorFit Pro 5 या नावाने लाँच करण्यात आले आहे.

ही वॉच 20 नोव्हेंबरपासून Noise च्या वेबसाइट आणि Amazon.in वरून खरेदी करता येईल.

या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.

स्मार्टवॉच श्रेणीतील सुप्रसिद्ध नाव Noise ने भारतात एक नवीन उपकरण सादर केले आहे. कंपनीचे नवीन उपकरण Noise ColorFit Pro 5 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच AMOLED डिस्प्ले, SOS फीचर इत्यादींनी सुसज्ज केले आहे. हे Android आणि iOS दोन्ही उपकरणांसह जोडते. चला तर मग या स्मार्टवॉचची किंमत आणि सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: Great Lowest Price Sale: iPhone चा हा मॉडेल हजारो रुपयांच्या सवलतींसह खरेदी करा, बघा अप्रतिम ऑफर!

Noise ColorFit Pro 5 ची भारतात किंमत

Noise ColorFit Pro 5 स्मार्टवॉच 3,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला मेटल स्ट्रॅप मिळतील, ज्यामध्ये एलिट रोज गोल्ड आणि एलिट ब्लॅक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. हे लेदर स्ट्रॅपमध्ये देखील असू शकते ज्यासाठी क्लासिक ब्लू आणि क्लासिक ब्राउनचे पर्याय दिले आहेत.

ही वॉच 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Noise च्या वेबसाइट आणि Amazon.in वरून खरेदी करता येईल. पहिल्या 500 ग्राहकांना 500 रुपयांची सूट मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

noise colorfit pro 4 alpha

Noise ColorFit Pro 5

नॉईज कलरफिट प्रो 5 मध्ये 1.85 इंच लांबीचा ऑल्वेज ऑन AMOLED डिस्प्ले आहे. वापरकर्त्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे कनेक्ट करते आणि ब्लूटूथ कॉलिंगला देखील समर्थन देते. या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचला IP68 रेटिंग मिळाले आहे, म्हणजेच याच धूळ आणि पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होईल.

यामधील उपलब्ध आरोग्य फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, 24 तास तुमच्या हृदयाचे ठोके निरीक्षण करते. हे रक्तातील ऑक्सिजनची पातळी देखील मोजते. झोपेचा मागोवा घेते. एवढेच नाही तर, या उपकरणाच्या मदतीने महिला त्यांची सायकल देखील ट्रॅक करू शकतात.

Noise fit App शी कनेक्ट करून, वापरकर्ते आणखी अनेक फीचर्स वापरण्यास सक्षम असतील. नॉइजचा दावा आहे की, त्याची बॅटरी 7 दिवस टिकू शकते. नोटिफिकेशन्स, वेदर अपडेट्स, रिमाइंडर्स, अलार्म इ. यात उपलब्ध आहेत. या वॉचसह फोनचा कॅमेरा आणि म्युझिकही कंट्रोल करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo