Mi Smart Band 7 ची किंमत लाँचपूर्वीच लीक, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

HIGHLIGHTS

Mi Smart Band 7 लवकरच ग्लोबली लाँच होणार

स्मार्ट बँडची सुरुवातीची किंमत सुमारे 4,069 रुपये

सिंगल चार्जवर तब्बल 15 दिवस टिकणारी बॅटरी उपलब्ध

Mi Smart Band 7 ची किंमत लाँचपूर्वीच लीक, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स

Xiaomi लवकरच त्याचा नवीनतम फिटनेस ट्रॅकर – Mi Smart Band 7 जागतिक स्तरावर लाँच करणार आहे. अलीकडेच, स्मार्ट बँड इन्फोकॉम मीडिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (IMDA) आणि NCC वर ऑनलाइन दिसला. त्यानंतर आता त्याची संभाव्य किंमत ऑनलाइन समोर आली आहे. एका लोकप्रिय टिपस्टरने संभाव्य युरोपियन किंमत लीक केली आहे. यामुळे कंपनी लवकरच जागतिक स्तरावर फिटनेस ट्रॅकर लाँच करेल, हे समजते. चला तर जाणून घेऊयात स्मार्टबँडची किंमत आणि फीचर्स…

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : जबरदस्त ! Elista ने एकाच वेळी तीन प्रिमियम स्मार्ट टीव्ही लाँच केले, मिळेल अलेक्सा सपोर्ट

Mi Smart Band 7 ची संभाव्य किंमत  

सुप्रसिद्ध टिपस्टर SnoopyTech च्या मते, Mi Smart Band 7 ची किंमत 50 युरो म्हणजेच अंदाजे 4,069 रुपये ते 60 युरो म्हणजेच अंदाजे 4,883 रुपये या दरम्यान सांगितली जात आहे. कंपनीने आधीच चीनमध्ये फिटनेस ट्रॅकर लाँच केला आहे. आता लवकरच त्याच व्हेरिएंटमध्ये बँड जागतिक स्तरावर लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

Mi Smart band 7

Mi स्मार्ट Band 7 चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi स्मार्ट बँड 7 मध्ये 192×490 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.62-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे. AMOLED टच डिस्प्ले 500 nits ब्राइटनेस देतो. फिटनेस ट्रॅकर ब्लूटूथ v5.2 ला समर्थन देतो आणि Android-iOS ऑपरेटिंग सिस्टमशी सुसंगत आहे.

जल-प्रतिरोधक Xiaomi स्मार्ट बँड 7 ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर आणि सिक्स- एक्सिस मोशन सेन्सरने सुसज्ज आहे. यामध्ये 120 वर्कआउट मोड आहेत, ज्यामध्ये इनडोअर आणि आउटडोअर रनिंग, सायकलिंग, स्किपिंग रोप यांसारखे बरेच एक्सरसाइज मोड समाविष्ट आहेत.

Xiaomi स्मार्ट बँड 7 झोप आणि महिलांच्या आरोग्याचा मागोवा घेण्यास देखील सक्षम आहे. डिव्हाइस 100 पेक्षा जास्त वॉच फेस ऑफर करतो. यमध्ये, 180mAh बॅटरीद्वारे आहे, जी सिंगल चार्जवर 15 दिवसांच्या बॅटरी बॅकअप देईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo