देशांतर्गत कंपनी Maxima ने आपले नवीन स्मार्टवॉच Max Pro Turbo भारतात लाँच केले आहे. स्मार्टवॉचसह ऍपल सिरी आणि गुगल व्हॉईस असिस्टंटचा देखील सपोर्ट आहेत. या वॉचमध्ये एक क्राऊन देखील आहे जो तुम्ही स्क्रोलिंगसाठी वापरू शकता. Max Pro Turbo ची किंमत 2,999 रुपये आहे आणि ती केवळ Amazon India वरून खरेदी करता येईल. येथून खरेदी करा…
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, मॅक्स प्रो टर्बो सह ब्लूटूथ कॉलिंगसाठी सपोर्ट आहे आणि यासाठी माइकसह स्पीकर देखील देण्यात आला आहे. कंटेंट झूम करण्यासाठी क्राउनचा वापर केला जाऊ शकतो. या वॉचमध्ये 550 nits ब्राइटनेससह 1.69 इंच HD IPS डिस्प्ले आहे.
वॉचमध्ये कॉल म्यूट ऑप्शन देखील मिळेल. याशिवाय क्राउनच्या मदतीने वॉच सायलेंट मोडमध्येही ठेवता येईल. मॅक्स प्रो टर्बो वॉच मल्टिपल स्पोर्ट्स मोड आणि 24-तास हार्ट रेट ट्रॅकिंग आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग सेन्सर (SpO2) सह येते.
ही स्मार्टवॉच मिडनाईट ब्लॅक, गोल्ड ब्लॅक, आर्मी ग्रीन आणि सिल्व्हर कलर कलरमध्ये खरेदी करता येईल. यासह, 100+ क्लाउड वॉच फेसेस सुद्धा मिळतील.
नवीन स्मार्टवॉचच्या लाँचबद्दल बोलताना, Maxima वॉचेसचे मॅनेजिंग पार्टनर, मनजोत पुरेवाल म्हणाले, “आम्हाला Amazon सोबत हे ऑनलाइन लाँच करताना अत्यंत आनंद होत आहे. मॅक्स प्रो टर्बो अनेक वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आला आहे. ऍक्टिव्ह क्राउन टेक्नॉलॉजी आणि AI व्हॉईस असिस्टंट असलेले हे पहिले मेड इन इंडिया स्मार्टवॉच आहे, ज्याची किंमत फक्त रु. 2,999 आहे. Amazon वर या डिवाइसला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे."
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile