HIGHLIGHTS
Maxima Max Pro Nitro भारतात लाँच
या वॉचसह प्रीमियम मेटॅलिक डिझाईन आहे.
या स्मार्टवॉचची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे.
देशांतर्गत कंपनी Maxima ने आपले नवीन स्मार्टवॉच Maxima Max Pro Nitro हे भारतीय बाजारात लाँच केले आहे. ही वॉच Maxima Max Pro Nitro केवळ Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वॉचसह प्रीमियम मेटॅलिक डिझाईन आहे.
SurveyMaxima Max Pro Nitro ची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे. यासह सिलिकॉन स्ट्रॅप, टॅन लेदर स्ट्रॅप आणि बरगंडी लेदर स्ट्रॅपसह देखील असू शकते. ही वॉच स्पेस ब्लॅक, रोझ गोल्ड ब्लॅक आणि सिल्व्हर ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.
Maxima Max Pro Nitro मध्ये 1.39-इंच लांबीचा राउंड HD Plus डिस्प्ले आहे. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, त्यात माइक आणि स्पीकर देखील देण्यात आला आहे. कंपनीने सांगितले की, यात HD स्पीकर आहेत. तसेच, यामध्ये Realtek चा चिपसेट मिळणार आहे.
या वॉचमध्ये 100+ स्पोर्ट्स मोड आणि इनबिल्ट गेम देखील आहेत. तसेच, यामध्ये पाण्याच्या प्रतिकारासाठी IP67 रेटिंग मिळाली आहे. यात AI व्हॉईस असिस्टंटचाही सपोर्ट आहे. आरोग्यविषयक फिचर म्हणून यात हार्ट रेट मॉनिटर व्यतिरिक्त SpO2 सेन्सर आणि स्लीप ट्रॅकिंग उपलब्ध आहेत. तसेच, वॉचमध्ये महिलांसाठीचे खास फिचर पीरियड ट्रॅकर देखील आहे. अशाप्रकारे ही वॉच बजेटमध्ये मुलींसाठी उत्तम पर्याय ठरेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile