गार्मिन इंडियाने ‘विवोस्मार्ट HR’ एक्टिविटी ट्रॅकर केला लाँच

गार्मिन इंडियाने ‘विवोस्मार्ट HR’ एक्टिविटी ट्रॅकर केला लाँच
HIGHLIGHTS

हा डिवाइस स्मार्टफोनशी जोडू शकतो आणि ह्यात टेक्स्ट, कॉल, ईमेल, कॅलेंडर, सोशल मिडिया अलर्ट, म्यूजिक कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये आहेत.

गार्मिन इंडियाने ‘विवोस्मार्ट HR’ अॅक्टिव्हिटी ट्रॅकर सादर केला आहे. ह्या डिवाइसची खास गोष्ट म्हणजे हा रिस्ट-वेस्ट हार्ट रेट आणि स्मार्ट नोटिफिकेशन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

 

कंपनीने ‘विवोस्मार्ट HR’ अॅक्टिव्हिटी ट्रॅकरची किंमत १४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्या डिवाइसला ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावरुन खरेदी करु शकता.

हा ट्रॅकर पातळ बँडसारखा आहे, जो खूपच हलका आणि आरामदायक आहे. ह्यामुळे आपण हा दिवसभर वापरु शकतो. हा आपल्या ह्रद्याच्या ठोक्यांवर चोवीस तास नजर ठेवेल.
 

ह्या डिवाइसच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा डिवाइस स्मार्टफोनशी जोडता येतो आणि ह्यात टेक्स्ट, कॉल, ईमेल, कॅलेंडर, सोशल मिडिया अलर्ट, म्यूजिक कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये आहेत. ह्यात जास्त सूर्यप्रकाशात वाचता येणार डिस्प्ले नेहमीच चालू राहते.

हा ह्रद्याचे ठोके मोजतो. जेव्हा आपण चालतो, पाय-या चढतो किंवा कोणत्याही प्रकारे कॅलरी जाळतो, तेव्हा हा ह्या सर्व क्रियांना मोजतो. ह्या बॅटरीची क्षमता ७ दिवसांची आहे आणि ५० मीटर खोल पाण्यातसुद्धा ही खराब होत नाही.

हेदेखील वाचा – लावा आयरिश फ्यूल F2: 3000mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे हा स्मार्टफोन

हेदेखील वाचा – १५००० पेक्षा कमी किंमतीत येणारे हे स्मार्टफोन्स येतात उत्कृष्ट बॅटरी लाइफसह

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo