FASTRACK चे 1.3 इंच AMOLED डिस्प्लेसह नवीन स्मार्टवॉच Reflex Play भारतात लाँच, पहा किंमत

FASTRACK चे 1.3 इंच AMOLED डिस्प्लेसह नवीन स्मार्टवॉच Reflex Play भारतात लाँच, पहा किंमत
HIGHLIGHTS

Fastrack चे नवीन स्मार्टवॉच REFLEX PLAY

बऱ्याच नवीन फीचर्ससह येणार स्मार्टवॉच

नव्या स्मार्टवॉचमध्ये 25 पेक्षा जास्त स्पोर्ट मोड्स उपलब्ध

नुकतेच नवीन फीचर्स असलेले FASTRACK चे Reflex Play स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. 25 हून अधिक स्पोर्ट मोड्स देण्यात आले आहेत. यात बिल्ट-इन गेम देखील आहेत. या स्मार्टवॉचमध्ये दिलेल्या फीचरद्वारे अनेक गोष्टींना ट्रॅक करता येईल. यामध्ये हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि वूमन हेल्थ ट्रॅकर देखील देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही Reflex World प्रोग्रामद्वारे कनेक्ट करून वॉचमध्ये कलेक्ट केलेला डेटा पाहू शकता… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! FLIPKART सेलमध्ये iPhone 12 मिळतोय स्वस्त, 35000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध  

FASTRACK च्या स्मार्टवॉचमध्ये REFLEX PLAY फीचर्स 

त्यात अनेक ऍनिमेटेड वॉच फेस दिलेले आहेत. यामध्ये ऑल्वेज -ऑन डिस्प्ले आणि नोटिफिकेशन्स असतात, ज्यामुळे महत्त्वाचे मॅसेज, ईमेल, वेदर अपडेट्स आणि कॅलेंडरमध्ये ऍक्सेस करता येते. यामध्ये तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, योगा इत्यादी विविध गेम्स मोड दिले गेले आहेत. यात 1.3 AMOLED स्क्रीन आहे. यात ब्रीदिंग एक्सरसाइज, बिल्ट इन गेम, कॅमेरा कन्ट्रोल आणि म्युझिक कन्ट्रोल यांसारखे फीचर्स देखील आहेत.

FASTRACK स्मार्टवॉच REFLEX PLAY ची किंमत 

ऍमेझॉनवर अतिशय स्वस्त दरात स्मार्टवॉच विकले जात आहे. या Fastrack नवीन स्मार्टवॉच रिफ्लेक्स प्लेची भारतात किंमत आणि त्याचे रंग पर्याय जाणून घेऊया… 

भारतात, Fastrack Reflex Play स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, ऑरेंज आणि पिंक या चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फास्ट्रॅक प्लेची किंमत 7,995 रुपये ठेवण्यात आली आहे. पण, Amazon प्राइम डे सेल दरम्यान ते 5,995 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, अधिकृत वेबसाइटवर ते अजूनही त्याच किंमतीत उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo