आकर्षक लुकसह Dizo चे दोन परवडणारे स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

आकर्षक लुकसह Dizo चे दोन परवडणारे स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Dizo Watch R Talk आणि Dizo Watch D Talk भारतात लाँच

स्मार्टवॉच डिझो फिट ऍपसह पेयर करता येईल

हे दोन्ही स्मार्टवॉच फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत

कमी बजेटमध्ये सुंदर दिसणारे स्मार्टवॉच शोधत आहात, तर तुमचा शोध आता संपला आहे. Realme च्या TechLife ब्रँड Dizo ने Dizo Watch R Talk आणि Dizo Watch D Talk भारतात लाँच केले आहे. डिजो वॉच आर टॉकच्या फीचर्समध्ये ऑल्वेज ऑन-डिस्प्ले फीचरसह 1.3-इंच गोलाकार AMOLED डायल, 360×360 रिझोल्यूशन आणि 500nits ब्राइटनेस समाविष्ट आहे. दुसरीकडे, Dizo Watch D Talkमध्ये 550nits ब्राइटनेस आणि 240×286 रिझोल्यूशनसह 1.8-इंच स्क्वेअर डायल आहे. 

हे सुद्धा वाचा : तुमचे PAN CARD हरवले असेल तर काळजी करू नका, 'अशा' प्रकारे ई-पॅन डाउनलोड करा

Dizo Watch R Talk

स्मार्टवॉचमध्ये 1.3-इंच लांबीचा गोलाकार AMOLED डायल आहे जो 360×360 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 500 ​​nits ब्राइटनेस देते. ही वॉच 5ATM वॉटर रेझिस्टन्स आणि प्रोटेक्शनसाठी 2D कर्व्ड ग्लास आणि 150 पेक्षा जास्त वॉचफेससह येते. स्मार्टवॉच ट्रेकिंग, धावणे, चालणे, पोहणे, ट्रेडमिल आणि बरेच काही यासह 110 हून अधिक स्पोर्ट्स मोडद्वारे समर्थित आहे. 

यात ड्रिंक रिमाइंडर, सेडेंटरी रिमाइंडर, ब्रीद ट्रेनिंग, पीरियड ट्रॅकर यासह अनेक फीचर्स आहेत. तसेच, यात स्लीप ट्रॅकर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि सतत हार्ट रेट ट्रॅकर आहे. कंपनीचा दावा आहे की, स्मार्टवॉच 12 दिवसांपर्यंत बॅटरीचे लाईफ देते. 

Dizo Watch D Talk

स्मार्टवॉचमध्ये 1.8-इंच चौरस आकाराचा डिस्प्ले आहे, जो 550 निट्स ब्राइटनेस प्रदान करतो. स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फिचर समाविष्ट आहे. यात वापरकर्त्यांना 150 पेक्षा जास्त वॉचफेस देखील मिळतील. स्मार्टवॉच डिझो फिट ऍपसह पेयर करता येईल. ही वॉच 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि स्लीप ट्रॅकर, SpO2 ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, ड्रिंक वॉटर रिमाइंडर, स्टेप काउंटर यांसारख्या आरोग्य देखरेख फीचर्ससह सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की स्मार्टवॉच 7 दिवसांपर्यंत बॅटरीचे लाईफ देते.

Dizo Watch R Talk आणि D Talk ची किंमत 

Dizo Watch R Talk भारतात 4,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. प्रास्ताविक ऑफर अंतर्गत, ती सध्या केवळ 3,799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे 13 सप्टेंबरपासून Flipkart वर ग्रे आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होईल.

डिझो वॉच डी टॉक 3,999 आणि 2,799 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हे ग्रे, ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. हे वॉच 16 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo