लूक्स आणि फीचर्समध्ये सर्वांना फेल करेल Crossbeatsचे नवीन स्मार्टवॉच, किंमतदेखील कमी

लूक्स आणि फीचर्समध्ये सर्वांना फेल करेल Crossbeatsचे नवीन स्मार्टवॉच, किंमतदेखील कमी
HIGHLIGHTS

Crossbeats Ignite Atlas स्मार्टवॉच भारतात लाँच

स्मार्टवॉचची रिटेल किंमत 5,999 रुपये

प्री-ऑर्डरसाठी अधिकृत वेबसाइटवर 4,999 रुपयांना उपलब्ध

Crossbeats Ignite Atlas स्मार्टवॉच भारतात 15 जून रोजी 1.69-इंच HD डिस्प्ले आणि 30 प्रीसेट स्पोर्ट्स मोडसह लाँच करण्यात आले आहे. वेअरेबल केवळ 17 जून ते 20 जून दरम्यान क्रॉसबीट्सच्या अधिकृत वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी डिलिव्हर केले जाईल. स्मार्टवॉच पाच रंगांमध्ये येते, त्यापैकी तीन ड्युअल-टोन कलर स्कीम आहेत. यात बिल-इन GPS, ब्लूटूथ व्हॉईस कॉलिंग, हेल्थ मॉनिटरिंगसाठी AI सेन्सर आणि 100 पेक्षा जास्त वॉच फेस आहेत. स्मार्टवॉच Google Fit, Strava आणि Apple Health सह पेयर होऊ शकते.

हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! आता 10 पट जास्त स्पीडने चालेल इंटरनेट, सरकारने सांगितली 5G लाँचची तारीख

Crossbeats Ignite Atlas ची किंमत आणि उपलब्धता

Crossbeats चे नवीन स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी 4,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध आहे. Crossbeats Ignite Atlas ची भारतात रिटेल किंमत 5,999 रुपये आहे. विविड ब्लॅक, इम्पीरियल ब्लू, स्कार्लेट ग्रीन, स्कार्लेट ग्रे आणि फेयरी रेड या पाच कलर्समध्ये हे स्मार्टवॉच सादर करण्यात आले आहे. स्कार्लेट ग्रीन, स्कार्लेट ग्रे आणि फेयरी रेड कलर पर्याय होल-पंच स्टाइल स्ट्रॅप आणि ड्युअल-कलर स्कीमसह येतील.

Crossbeats Ignite Atlas चे फीचर्स

नवीन क्रॉसबीट्स स्मार्टवॉचमध्ये HD रिझोल्यूशन (240×280) सह 1.69-इंच लांबीची IPS टचस्क्रीन आहे. यात 100 पेक्षा जास्त फेसेस आहेत. डिस्प्ले 500 nits ब्राइटनेस देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. Ignite Atlas हे उपकरण प्रीमियम ABS मटेरियलने बनवलेले आहे आणि IP67 वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट रेटिंगसह येते. स्मार्टवॉचचे डायमेन्शन 45x38x13mm आणि वजन 45g आहे. याला iOS आणि Android दोन्हीसह पेयर करण्यासाठी ब्लूटूथ वर्जन 3.0 आणि 5.0 आहे. हे स्मार्टवॉच Realtek ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.

स्मार्टवॉच हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, पेडोमीटर, स्ट्रेस मॉनिटरिंग आणि स्लीप ट्रॅकिंगसह अनेक आरोग्य वैशिष्ट्यांसह येते. तसेच, यात रनिंग, हायकिंग, बाइकिंग आणि स्विमिंग असे 30 स्पोर्ट्स मोड आहेत. स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन GPS, ड्युअल-सॅटेलाइट ग्लोनास आणि मल्टी-मोशन ऍक्टिव्हिटी सेन्सर देखील आहे.

या व्यतिरिक्त, वेअरेबलमध्ये चार्जिंगसाठी मॅग्नेटिक पिनसह 420mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी मिळेल. हे उपकरण सामान्य वापरासह 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ आणि GPS ट्रॅकिंग सक्षम असल्यास 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ ऑफर करते. यात 20 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देखील आहे. Ignite Atlas सह, ग्राहकांना बॉक्समध्ये एक स्ट्रॅप आणि एक चार्जिंग केबल मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo