Crossbeats Ignite Grande: अल्ट्रा HD डिस्प्ले आणि कॉलिंग फिचर उपलब्ध, जाणून घ्या किंमत

Crossbeats Ignite Grande: अल्ट्रा HD डिस्प्ले आणि कॉलिंग फिचर उपलब्ध, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Crossbeats Ignite Grande स्मार्टवॉच भारतात लाँच

स्मार्टवॉचची किंमत एकूण 3,499 रुपये

वॉच Crossbeats Xplore ऍपशी सहजपणे कनेक्ट करता येईल.

Crossbeats ने भारतात आपले नवीन Crossbeats Ignite Grande स्मार्टवॉच लाँच केले आहे. Crossbeats Ignite Grande स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग फीचर्ससह येते, ज्यामध्ये 1.75-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. ही वॉच Crossbeats Xplore ऍपशी सहजपणे कनेक्ट करू शकता, जे भारतात बनवलेले ऍप आहे. वॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन देखील आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टवॉचचे इतर फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत…

हे सुद्धा वाचा : नवीन लॅपटॉप खरेदी करायचंय ? Amazon Great Freedom Festival सेलमध्ये लॅपटॉप्सवर मिळतायेत सर्वोत्तम ऑफर्स

Crossbeats Ignite Grande चे स्पेसिफिकेशन्स 

Crossbeats Ignite Grande मध्ये Realtek 8763 प्रोसेसर आणि ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट उपलब्ध आहे. यात कॉलिंगसाठी इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन देखील आहे. वॉचमध्ये 60Hz रिफ्रेश रेट आणि 320×385 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.75-इंच लांबीचा अल्ट्रा HD LTPS डिस्प्ले आहे.  

Crossbeats Ignite Grande स्मार्टवॉच मल्टी हेल्थ आणि स्पोर्ट्स मोडसह येते. ही वॉच Crossbeats Xplore ऍपशी सहजपणे कनेक्ट करता येते. कंपनीने Crossbeats Xplore ऍपबाबत वापरकर्त्यांच्या चांगल्या प्रायव्हसीचा दावाही केला आहे.

बॅटरीबद्दल, कंपनीचा दावा आहे की, ही वॉच फास्ट चार्ज होऊ शकते आणि एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते ब्लूटूथ कॉलिंगशिवाय एकूण 7 दिवस आणि ब्लूटूथ कॉलिंगसह 2 दिवस चालू शकते. Crossbeats Ignite Grande मध्ये  स्लीप ट्रॅकिंग, 24-तास हार्ट रेट ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन ट्रॅक करण्यासाठी SpO2 सेन्सरसाठी समर्थन आहे.

Crossbeats Ignite Grande ची किंमत 

Crossbeats Ignite Grande आर्क्टिक ब्लू, ग्रेफाइट ग्रे आणि सॅफायर ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली असून क्रॉसबीट्स आणि ऍमेझॉन इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून ते खरेदी करता येईल. मात्र, अद्याप स्मार्टवॉचची विक्री सुरू झालेली नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo