जबरदस्त लूक आणि फीचर्ससह Boult च्या दोन स्मार्टवॉच लाँच, किंमत 1,500 रुपयांपेक्षा कमी

जबरदस्त लूक आणि फीचर्ससह Boult च्या दोन स्मार्टवॉच लाँच, किंमत 1,500 रुपयांपेक्षा कमी
HIGHLIGHTS

Boult Drift आणि Boult Cosmic नवीन स्मार्टवॉच लाँच

स्मार्टवॉचची किंमत 1,499 रुपये

दोन्ही स्मार्टवॉच हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर आणि मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकरने सुसज्ज

ऑडियो कंपनी Boult ने वेयरेबल सेगमेंटमध्ये दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत. बजेट ऑडिओ सेगमेंटमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी कंपनीने दोन स्मार्टवॉच लाँच केले, ज्यांना ड्रीफ्ट आणि कॉस्मिक स्मार्टवॉच असे नाव दिले गेले आहे. दोन्ही स्मार्टवॉच हार्ट रेट सेन्सर, SpO2 मॉनिटर आणि मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकरने सुसज्ज आहेत. चला तर जाणून घेऊयात स्मार्टवॉचेसची किंमत आणि फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : Jio युजर्सना सबस्क्रिप्शनशिवाय Netflix चा आनंद फ्रीमध्ये घेता येईल, जाणून घ्या काय आहे ऑफर

Boult Drift आणि Boult Cosmic ची किंमत आणि उपलब्धता

Boult Drift स्मार्टवॉच Boult Cosmic साठी 1,999 रुपयांना लाँच करण्यात आली होती आणि त्याची ते 1,499 रुपयांना येईल. स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. बोल्ट ड्रिफ्ट ब्लू, ब्लॅक आणि ग्रे सारख्या आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. तर बोल्ट कॉस्मिक रोझ गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक शेड्समध्ये उपलब्ध आहे.

boult drift and boult cosmic smartwatch

Boult Drift आणि Boult Cosmic चे फीचर्स 

बोल्ट ड्रिफ्ट स्मार्टवॉचमध्ये 240×280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69-इंच TFT स्क्रीन आहे. यात 60 प्रीसेट स्पोर्ट्स मोड आणि 150+ वॉच फेस आहेत. यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग देखील आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमचा हार्ट रेट कधीही तपासता येईल.

यात एक स्वयंचलित स्लीप मॉनिटर देखील आहे, जो तुमच्या झोपेच्या गुणवत्तेचे (गाढ झोप, हलकी झोप आणि जागे होण्याची वेळ) सर्वसमावेशक विश्लेषण प्रदान करतो. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी अधिक सविस्तर माहिती मिळेल. मॉड्यूल आणि इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर देखील आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचे इनकमिंग कॉल रिसिव्ह आणि डायल करता येतील.  

Boult Cosmic स्मार्टवॉचमध्ये 240×280 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.69-इंच TFT डिस्प्ले आहे. 500 nits हाय  ब्राइटनेस डिस्प्ले आणि 100+ वॉच फेसेस आहेत. हे उपकरण ब्लड प्रेशर मॉनिटर, ब्लड सॅच्युरेशन ट्रॅकर, हार्ट रेट मॉनिटर, मेन्स्ट्रुअल सायकल मॉनिटर, वॉटर रेझिस्टन्स आणि अनेक स्पोर्ट्स मोडसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo