boAt Xtend Talk : तुमच्याशी बोलणारे स्मार्टवॉच लाँच, हवामानापासून ते ट्राफिकपर्यंत सांगणार सर्व माहिती

boAt Xtend Talk : तुमच्याशी बोलणारे स्मार्टवॉच लाँच, हवामानापासून ते ट्राफिकपर्यंत सांगणार सर्व माहिती
HIGHLIGHTS

boAt Xtend Talk स्मार्टवॉच लाँच

नवीन स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये

ही स्मार्टवॉच तुमच्याशी संवाद करेल

boAt ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. कंपनीने उत्कृष्ट फीचर्स असलेल्या या वॉचला Xtend Talk असे नाव दिले आहे. बोटचे हे नवीन वॉच Realme Watch3, Noise ColorFit Pro 4 शी स्पर्धा करेल. boAt Xtend Talk मध्ये ब्लूटूथ कॉलिंगशी संबंधित नवीन फिचर आहेत. स्मार्टवॉचमध्ये ऍमेझॉनचा व्हॉइस असिस्टंट अलेक्सा आहे जो युजर्सशी संवाद करतो. जाणून घेऊयात नव्या स्मार्टवॉचची किंमत आणि जबरदस्त फीचर्स… 

हे सुद्धा वाचा : मोठी बातमी : iPhone 14 ची लाँच डेट कन्फर्म, Apple इव्हेंट 'या' तारखेला होणार

boAt Xtend Talk फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

स्मार्टवॉचमध्ये HD+ रिझोल्यूशनसह 1.69-इंच लांबीचा स्क्वेयर डिस्प्ले आहे. वॉचला  वॉटर-रेसिस्टंटसाठी IP68 रेट केले आहे आणि नेव्हिगेशनसाठी उजवीकडे एक बटण आहे. तसेच, यमहदये ग्राहकांना 150 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतील.

यामध्ये अलेक्सा सह HD स्पीकर आहे, जे वापरकर्त्यांना हवामानाचा अंदाज, लेटेस्ट क्रिकेट स्कोअर, ट्राफिक स्थिती ट्रॅक करण्यास किंवा अलार्म आणि रिमाइंडर्स सेट करण्यात मदत करेल. स्मार्टवॉच सामान्य वापरासह 10 दिवसांपर्यंत आणि ब्लूटूथ कॉलिंग मोडसह 2 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देण्याचा दावा आहे. 

BoAt Xtend Talk मध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर आहे. याशिवाय, यात 60 हून अधिक गेम मोड सपोर्ट आहे. शिवाय, स्मार्टवॉच Apple Health आणि Google Fit सह कार्य करते. स्मार्टवॉच IP68 डस्ट, स्वेट आणि स्प्लॅश-रेसिस्टंट आहे.

boAt Xtend Talk ची किंमत आणि उपलब्धता

बोट Xtend स्मार्टवॉचची किंमत 2,999 रुपये आहे. हे स्मार्टवॉच 24 ऑगस्टपासून बोट आणि Amazon वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. boAt Xtend Talk वॉच पिच ब्लॅक, चेरी ब्लॉसम आणि टील ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये स्पीकर आणि मायक्रोफोन इनबिल्ट आहेत. ब्लूटूथ कॉलिंग वापरून युजर्स त्यांच्या संपर्कांशी त्वरित कनेक्ट होऊ शकतात. याव्यतिरिक्त, स्मार्टवॉचमध्ये अलेक्सा व्हॉईस असिस्टंट इंटिग्रेटेड आहे. यामध्ये 300mAh बॅटरी मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo