प्रीमियम डिझाईनसह Ambrane चे नवे स्मार्टवॉच लाँच, किंमतही कमी

HIGHLIGHTS

Ambrane Wise Roam 2 स्वस्त स्मार्टवॉच बाजारात लाँच

नव्या स्मार्टवॉचची किमंत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे.

या वॉचसह Apple सिरी आणि Amazon अलेक्साचे सपोर्ट आहे.

प्रीमियम डिझाईनसह Ambrane चे नवे स्मार्टवॉच लाँच, किंमतही कमी

देशांतर्गत कंपनी Ambrane ने आपले नवीन स्मार्टवॉच Ambrane Wise Roam 2 लाँच केले आहे. Ambrane Wise Roam 2 हे एक स्टायलिश आणि प्रीमियम लुक स्मार्टवॉच आहे.  यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंगही देण्यात आले आहे. जाणून घेऊयात किंमत आणि स्पेसिफिकेशन्स – 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

किंमत :

Ambrane Wise Roam 2 ची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टवॉचची सेल फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर सुरू झाली आहे. या वॉचसह एक वर्षाची वॉरंटी देखील उपलब्ध आहे. ही वॉच ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि ग्रीन या चार प्रीमियम कलरमध्ये सादर करण्यात आली आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

या स्मार्टवॉचसह 1.39 इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. अँब्रेनच्या या वॉचमधून तुम्ही थेट कॉल करू शकता. यामध्ये कॉलिंगसाठी मायक्रोफोन आणि स्पीकर देखील आहे. तसेच, 100+ क्लाउड आधारित वॉच फेस उपलब्ध असतील. या वाचसह फोनद्वारे कॅमेरा आणि म्युझिक देखील कन्ट्रोल करता येईल.   

 आरोग्याची घेण्यासाठी यात 100+ स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. तसेच, यामध्ये ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग, हार्ट रेट सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर, ब्रीद मोड, स्लीप मोड, पीरियड ट्रॅकिंग इत्यादीसाठी SpO2 सेन्सर समाविष्ट आहे. Ambrane Wise Roam 2 ला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग देखील मिळाली आहे. या वॉचसह Apple सिरी  आणि Amazon अलेक्साचे सपोर्ट आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo