Xiaomi Mi LED Smart TV 4 फक्त काही मिनिटांत झाला सोल्ड आउट

Updated on 07-Mar-2018
HIGHLIGHTS

Xiaomi Mi LED Smart TV 4 फ्लिपकार्ट आणि Mi.com वर सेल साठी आल्यानंतर फक्त काहीच मिनिटांत सोल्ड आउट झाला.

Xiaomi Mi LED Smart TV 4 काल दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि Mi.com वर सेल साठी उपलब्ध झाला होता. सेल सुरू होताच काही मिनिटांत हा डिवाइस सोल्ड आउट झाला. याचा पुढील सेल 13 मार्चला दुपारी 12 वाजता आयोजित केला जाईल. 
याची किंमत Rs. 39,999 आहे. 55 इंचाचा हा Mi LED स्मार्ट TV 4 4.9mm इतका बारीक आहे आणि यात लाइट डिजाइन आहे, हा 4K आणि HDR ला सपोर्ट करतो, हा टीवी शाओमी च्या पॅचवॉल ओएस वर चालतो. यात 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. 
 
कनेक्टिविटी साठी हा टीवी डुअल बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ 4.0 चा वापर करतो. हा 3 HDMI पोर्ट्स, 1 ARC, 1 USB 3.0 पोर्ट आणि 1 USB 2.0 पोर्ट ऑफर करतो. प्रॉसेसिंग यूनिट साठी Mi TV 4 माली T830 ग्राफिक्स सह एमलॉजिक 64 बिट क्वॉड कोर CPU चा वापर करतो. साउंड डिपार्टमेंट मध्ये Mi TV 4 Dolby+DTS सिनेमा ऑडियो क्वालिटी देतो. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :