Xiaomi ची ही स्वस्त आणि शानदार टीवी आज एकदा पुन्हा सेल साठी होईल उपलब्ध

Updated on 10-Apr-2018
HIGHLIGHTS

आज दुपारी 12 वाजल्यापासून या जागी सेल मध्ये विकत घेण्यासाठी उपलब्ध होणार आहेत, Xiaomi ची ह्या खास टीवी.

Xiaomi ने काही दिवसांपूर्वी भारतात Xiaomi Mi TV 4 आणि Mi TV 4A लॉन्च केल्या होत्या. ह्या टीवी वेगवेगळ्या किंमतीत आणि स्क्रीन साइज मध्ये लॉन्च केल्या गेल्या होत्या ज्यांना लोकांनी खुप पसंती दर्शवली आहे. आज Flipkart, Amazon आणि Mi.Com वर दुपारी 12 वाजता ह्या TV फ्लॅश सेल मध्ये उपलब्ध होतील. 

Mi TV 4 ची किंमत 39,999 रूपये आहे आणि हिची स्क्रीन साइज 55 इंच आहे. Xiaomi चे म्हणने आहे की हा टेलिविजन 500,000 तासांपेक्षा जास्त ऑफर करतो, ज्यात जवळपास 80 टक्के कंटेंट फ्री असेल, जो Hotstar, Voot, Voot Kids, Sony Liv, Hungama Play, Zee5, Sun NXT, ALT Balaji, Viu, TVF, आणि Flickstree सारख्या पार्टनर्स च्या माध्यमातून ऑफर केला जाईल, हा कंटेंट 15 भाषांमध्ये उपलब्ध होईल.  
स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Mi TV 4 मॉडेल मध्ये 4K रिजॉल्यूशन, HDR आणि LED डिस्प्ले आहे आणि याची रुंदी 4.9mm आहे. याचा पॅनल 178 डिग्री व्यूइंग एंगल आणि 8ms रिस्पॉन्स टाइम ऑफर करतो. हा टीवी 64 बिट क्वॉड कोर एम्लॉजिक कॉर्टेक्स A53 SoC वर चालतो आणि यात  Mali-T830 ग्राफिक्स आहे. 
हा 2GB रॅम आणि 8GB स्टोरेज सह येतो. यात डॉल्बी+DTS सिनेमा ऑडियो सह 2 8W डक्ट इनवर्टेड स्पीकर फीचर आहे. याव्यतिरिक्त यात भारतीय बाजारासाठी शाओमी चा AI संचालित पॅचवॉल UI पण आहे. 
Xiaomi च्या Mi LED Smart TV 4A च्या दोन्ही मॉडेल 32 इंच आणि 43 इंच सेल साठी उपलब्ध होतील ज्यांची किंमत क्रमश: Rs. 13,999 आणि Rs. 22,999 आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर या 43 इंचाच्या फुल एचडी डिस्प्ले चे रेजोल्यूशन (1920×1080 पिक्सल)आहे तर 32 इंचाच्या मॉडेल च्या डिस्प्ले चे रेजोल्यूशन 1366×768 पिक्सल आहे आणि या TV मध्ये फुल एचडी डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले पॅनल मध्ये 178 डिग्री व्यूइंग एंगल आणि 60Hz रिफ्रेश रेट आहे. दोन्ही Mi TV 4A मॉडेल एमलॉजिक क्वॉड कोर SoC वर चालतात. सोबतच यात 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज आहे. 

तसेच शेवटी हेही सांगेन की जर तुम्ही Xiaomi चा Redmi 5 स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर तुम्ही आता जाऊन घेऊ शकता. याचा अर्थ असा की तुम्हाला या स्मार्टफोन साठी कोणत्याही सेल ची वाट बघावी लागणार नाही. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :