SONY चा अल्ट्रा-प्रिमियम 65-इंच साईज 4K TV बाजारात दाखल, बघा जबरदस्त फीचर्स

SONY चा अल्ट्रा-प्रिमियम 65-इंच साईज 4K TV बाजारात दाखल, बघा जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

SONY चा अल्ट्रा-प्रिमियम 65-इंच साईज 4K TV लाँच

या नवीनतम TV ची भारतात किंमत 3,69,990 रुपये

TV 16 GB स्टोरेज सह Android TV OS वर काम करतो.

Sony ने आपल्या Bravia Master Series A95K OLED TV सिरीजमध्ये एक नवीन 65-इंच मॉडेल लाँच केले आहे. 4K QD-OLED पॅनल असलेल्या या टीव्हीचा मॉडेल क्रमांक XR-65A95K आहे. हा सोनी टीव्ही अल्ट्रा-प्रिमियम श्रेणीचा आहे. कंपनीने भारतात त्याची किंमत 3,69,990 रुपये ठेवली आहे.

 मात्र, हा टीव्ही कंपनीच्या वेबसाइटवर 3,51,490 रुपयांच्या किंमतीसह लिस्टेड आहे. सोनी सेंटर्सव्यतिरिक्त तुम्हाला हा TV लिडिंग इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येईल. हा नवीनतम सोनी टीव्ही डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी साउंड सारख्या अनेक उत्तम फीचर्ससह येतो.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Amazon GFF सेल आता फक्त दोन दिवस, बघा Microwave Ovensवरील जबरदस्त डिल्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

कंपनीच्या टीव्हीमध्ये 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह 65-इंच लांबीचा 4K QD-OLED डिस्प्ले आहे. हा टीव्ही HDR10 आणि डॉल्बी व्हिजन फीचर्सने सुसज्ज आहे. याशिवाय, कंपनी XR OLED मोशन, ऑटो मोड, ड्युअल डेटाबेस प्रोसेसिंग आणि XR 4K अपस्केलिंग देखील ऑफर करत आहे. पिक्चर कॉलिटी आणखी सुधारण्यासाठी, त्यात XR कॉग्निटिव प्रोसेसर देखील आहे.

दमदार आवाजासाठी टीव्हीमध्ये दोन स्पीकरसह दोन सब-वूफर आहेत. टीव्हीचे एकूण साउंड आउटपुट 60W आहे. डॉल्बी ऍटमॉस आणि DTS डिजिटल सराउंड या टीव्हीच्या आवाजाची गुणवत्ता थिएटरसारखी बनवतात. हा TV 16 GB स्टोरेज सह Android TV OS वर काम करतो.

टीव्ही उत्तम Google इंटरफेससह येतो. यामध्ये तुम्हाला व्हॉईस सर्च फीचर देखील मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, टीव्हीमध्ये ड्युअल बँड Wi-Fi, HDMI 2.1, इथरनेट पोर्ट, ब्लूटूथ 4.2, अंगभूत Chromecast, Apple AirPlay, Apple HomeKit आणि 3.5mm हेडफोन जॅक ऑप्शन्स मिळतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo