Samsungचा उत्कृष्ट 4K स्मार्ट TV लाँच, खरेदीवर वर्षभरासाठी Amazon प्राइम व्हिडिओ आणि Hotstar मोफत

Samsungचा उत्कृष्ट 4K स्मार्ट TV लाँच, खरेदीवर वर्षभरासाठी Amazon प्राइम व्हिडिओ आणि Hotstar मोफत
HIGHLIGHTS

Samsung चा Samsung Crystal 4K Neo TV लाँच

TV ची किंमत एकूण 35,990 रुपये

खरेदीवर युजर्सना कंपनीकडून एका वर्षासाठी Amazon Prime आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत

Samsungने Samsung Crystal 4K Neo TV लाँच केला असून, भारतात आपली 4K TV रेंज वाढवली आहे. 43 इंच साईजमध्ये येणारा हा TV क्रिस्टल क्लिअर पिक्चर क्वालिटी ऑफर करतो. या TV ची किंमत 35,990 रुपये आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, हे उपकरण Amazon India आणि Flipkart वर उपलब्ध केले जाईल. विशेष बाब म्हणजे हा टीव्ही खरेदी करणाऱ्या युजर्सना कंपनी एका वर्षासाठी Amazon Prime आणि Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. प्राइम व्हिडिओच्या मोफत सबस्क्रिप्शनसाठी, तुम्हाला Amazon India आणि Disney + Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसाठी फ्लिपकार्टवरून TV खरेदी करावा लागेल.

हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Moto च्या दमदार फोनची पहिली विक्री आज, मिळतेय हजारो रुपयांची भारी सवलत

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Samsung Crystal 4K Neo TV 43-इंच लांबीच्या अल्ट्रा HD डिस्प्लेसह येतो. TVमध्ये उत्तम पिक्चर कॉलिटीसाठी क्रिस्टल टेक्नॉलॉजीसह  HDR10+, वन बिलियन ट्रू कलर्स आणि क्रिस्टल 4K प्रोसेसरचा सपोर्ट दिला गेला आहे. गेमिंगसाठी कंपनी या टीव्हीमध्ये ऑटो गेम मोड आणि मोशन एक्सलेटर देत आहे. दमदार साउंड आउटपुटसह कंपनी या TVमध्ये डॉल्बी डिजिटल प्लससह स्मार्ट ऍडाॅप्टीव्ह साउंड फीचर देखील देत आहे.

हा टीव्ही सुरु असलेल्या कंटेंटनुसार साउंड ऍडजस्ट करतो. याशिवाय, तुम्हाला या टीव्हीमध्ये एक म्युझिक प्लेअर देखील पाहायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला टीव्हीचा वापर म्युझिक सिस्टम म्हणूनही करता येईल. सॅमसंगचा हा नवीनतम 4K टीव्ही Google असिस्टंटसह Bixby आणि Alexa ला देखील सपोर्ट करतो. कंपनी टीव्हीमध्ये युनिव्हर्सल गाइड देखील देत आहे.

याशिवाय, तुम्हाला टीव्हीमध्ये PC मोड देखील मिळेल, जो स्मार्ट टीव्हीला PC मध्ये रूपांतरित करतो. यूजर्स एक्सपेरियन्स चांगला बनवण्यासाठी कंपनी यात स्क्रीन मिररिंगचे फीचरही देत ​​आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी, तीन HDMI पोर्ट आणि एक USB पोर्ट व्यतिरिक्त सर्व स्टॅंडर्ड ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo