त्वरा करा ! Xiaomi चा 32 इंच स्मार्ट TV वर मिळतेय भारी सूट, ‘येथे’ मिळतेय आकर्षक ऑफर

त्वरा करा !  Xiaomi चा 32 इंच स्मार्ट TV वर मिळतेय भारी सूट, ‘येथे’ मिळतेय आकर्षक ऑफर
HIGHLIGHTS

Mi 5A 32-इंचाच्या LED स्मार्ट टीव्ही

स्मार्ट टीव्ही फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर बघुयात

जर तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. खरं तर, Xiaomi च्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या डिस्काउंटचा लाभ मिळत आहे. हा स्मार्ट टीव्ही तुम्ही अतिशय स्वस्त दरात खरेदी करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म FLIPKART वर स्‍मार्ट टीव्हीच्‍या खरेदीवर मिळणाऱ्या प्रचंड सवलतींबद्दल सांगणार आहोत. 

हे सुद्धा वाचा : BSNL प्लॅनमध्ये दररोज 2GB इंटरनेट डेटासह 365 दिवसांची वैधता, किंमत फक्त…

Mi 5A Smart TV 

किंमत आणि ऑफर्स : 

Mi 5A 32-इंचाच्या LED स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 24,999 रुपये आहे परंतु तुम्ही 52 टक्के सवलतीनंतर केवळ 11,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. ग्राहकांच्या सुविधेसाठी या स्मार्ट टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर आहे.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्या बदल्यात कोणताही जुना टीव्ही देऊ शकता. तुम्हाला त्याच्या एक्सचेंज ऑफरमध्ये 11,000 रुपयांचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. त्यानुसार तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय DBS बँक कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळते.

स्मार्ट टीव्हीवर 1 वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी आणि 2 वर्षांची पॅनल वॉरंटी आहे. याशिवाय, 10 दिवसांची रिटर्न पॉलिसी उपलब्ध आहे. 

स्पेसिफिकेशन्स : 

 Mi 5A 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही Netflix, Amazon Prime, Disney Plus Hotstar आणि YouTube सपोर्टसह येतो. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट बिल्ट सपोर्ट आहे. टीव्हीमध्ये 1366 x768 पिक्चर रिझोल्यूशनचा 32-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. तुम्हाला स्मार्ट टीव्हीमध्ये 20 W साउंड आउटपुट आणि 60 Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo