LeEco भारतात लाँच केले तीन नवीन 4K UHD टीव्ही, किंमत ५९,७९० रुपयांपासून सुरु

LeEco भारतात लाँच केले तीन नवीन 4K UHD टीव्ही, किंमत ५९,७९० रुपयांपासून सुरु
HIGHLIGHTS

हे तिन्ही टीव्ही सुपर3 सीरिजचे आहेत आणि हे तिन्ही LeEco च्या eUI 5.5 वर चालतात.

LeEco ने भारतात आपले तीन नवीन सुपर TV लाँच केले. हे तिन्ही टीव्ही सुपर3 सीरिजचे आहेत. ह्याची किंमत ५९,७९० रुपयांपासून सुरु होऊन १,४९,७९० रुपयापर्यंत आहे. ह्या टीव्हींची नावे आहेत सुपर3 X55, सुपर3 X65 आणि सुपर3 मॅक्स 65. ह्या तिन्हींमध्ये आपल्याला 4K UHD डिस्प्ले मिळत आहे आणि हा 1.4GHz क्वाड-कोर प्रोसेसरवर चालतो आणि ह्यात mali T760 MP4 GPU सुद्धा आहे. त्याशिवाय ह्यात मेटल बॉ़डी दिली आहे.

सुपर X55 विषयी बोलायचे झाले तर ह्यात 55 इंचाचा पॅनल आणि 2GB ची रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्यात 20W च्या 2.0 स्टीरियो स्पीकर्ससुद्धा दिले आहे. तसेच दुस-या टीव्ही सुपर3 X65 मध्ये आपल्याला 64 इंचाचा पॅनल दिला आहे आणि ह्या टीव्हीची किंमत ९९,७९० रुपये आहे. ह्यात आपल्याला 3GB रॅम आणि 16GB च्या स्टोरेजसह 20W चे 2.1 स्टीरियो स्पीकर्स मिळत आहे.

 

हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू

 

तर सुपर3 मॅक्स 65 मध्ये आपल्याला 65 इंचाचा पॅनल मिळत आहे. मात्र हा 3D आहे. जसे की X65 मध्ये आहे. ह्या टीव्हीमध्ये आपल्याला 3GB ची रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. आणि ह्यात 40W चे 2.1 स्टीरियो स्पीकर्स मिळत आहेत.
 

त्याशिवाय हे टीव्ही दोन वर्षासाठी LeEco च्या स्वत:च्या कॉन्टेंटच्या सब्सक्रिप्शनसह येतो. ह्या कॉन्टेंटची किंमत ९,८०० रुपये आहे.

 

हेदेखील वाचा – एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोननेही ६७% वाढवला आपल्या डाटा पॅक्सचा फायदा
हेदेखील वाचा – Prisma App मध्ये लवकर येणार व्हि़डियो एडिटिंग फिचर

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo