Cheapest Smart TV: मोठ्या टीव्हीवर पडतोय ऑफर्सचा पाऊस! घरातंच येतो थिएटरचा फील
Amazon वर वेगवेगळ्या स्क्रीन आकारांचे मध्यम श्रेणींचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध
नवीन टीव्ही खरेदीसाठी Amazon वर TCL, Redmi इ. चे टीव्ही उपलब्ध
या स्मार्ट टीव्हीसह तुम्हाला घरीच येईल थिएटरचा आनंद मिळणार आहे.
Cheapest Smart TV: तुम्हाला तुमच्या घरासाठी नवा स्मार्ट TV हवा असेल तर, हा रिपोर्ट खास तुमच्यासाठीच आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon या शॉपिंग वेबसाइटवर वेगवेगळ्या स्क्रीन आकारांचे आणि किंमत श्रेणींचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. नवीन टीव्ही खरेदीसाठी Amazon वर TCL आणि Redmi इ. अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. हे स्मार्ट टीव्ही ऑफरसह कमी किमतीत खरेदी करता येतील. या टीव्हीसह तुम्हाला घरीच येईल थिएटरचा फील-
SurveyAlso Read: Upcoming Smartphones in March 2025: ‘या’ महिन्यात भारतात लाँच होणार धमाल स्मार्टफोन्स!
Redmi F Series HD Ready Smart LED Fire TV
Redmi च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 11,499 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर 1000 रुपयांची बँक सूट आणि 557 रुपयांचा दरमहा EMI दिला जात आहे. या टीव्हीमध्ये 32 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. रेडमीचा हा स्मार्ट टीव्ही मिराकास्ट आणि विविड पिक्चर इंजिनसह येतो. उत्तम आवाजासाठी, टीव्हीमध्ये डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस व्हर्च्युअल एक्स आणि डीटीएस-एचडीचा सपोर्ट आहे.

TCL HD Smart Android LED TV
TCL HD Smart Android LED TV या टीव्हीची किंमत 16,990 रुपये आहे. यावर 824 रुपयांचा EMI आणि 1000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. यावर एक्सचेंज ऑफर देखील आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीमध्ये इन-बिल्ट वायफाय, स्क्रीन शेअरिंग, 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज आहे. मनोरंजनासाठी, टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ सारख्या OTT ऍप्सची सुविधा देण्यात आली आहे. यात 60Hz ची 40 इंच लांबीची HD स्क्रीन देण्यात आली आहे.
Hisense HD Smart Google LED TV
Hisense HD Smart Google LED TV या यादीतील जास्त किमतीचा स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीची किंमत 18,999 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेकडून 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. टीव्हीवर 921 रुपयांचा EMI दिला जात आहे. या टीव्हीमध्ये 43 इंच लांबीचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे, त्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये गुगल टीव्ही ओएस, गुगल असिस्टंट, क्रोमकास्ट तसेच नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि सोनी लिव्ह सारख्या प्रीमियम ऍप्स चा ऍक्सेस आहे. अधिक ऑफर्स आणि माहितीसाठी Amazon साईटला भेट द्या.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile