Best Deal: फक्त 10,000 रुपयांमध्ये खरेदी करा 43 इंच Smart TV, घरबसल्या येईल अगदी थिएटरची मज्जा!

HIGHLIGHTS

Daiwa ने अलीकडेच भारतात आपले बजेट फ्रेंडली Smart TV सादर केले आहेत.

कंपनीने हे टीव्ही दोन 32-इंच आणि 43-इंच लांबीच्या आकारात लाँच केले.

मोठा टीव्ही केवळ 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Best Deal: फक्त 10,000 रुपयांमध्ये खरेदी करा 43 इंच Smart TV, घरबसल्या येईल अगदी थिएटरची मज्जा!

सुप्रसिद्ध टेक कंपनी Daiwa ने अलीकडेच भारतात आपले बजेट फ्रेंडली Smart TV सादर केले आहेत. कंपनीने हे टीव्ही दोन 32-इंच आणि 43-इंच लांबीच्या आकारात लाँच केले. आम्ह तुम्हाला सांगतो की, कंपनीचा 43-इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. जो ऑफर अंतर्गत केवळ 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Daiwa स्मार्ट टीव्हीची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: 50MP कॅमेरासह लेटेस्ट Oppo Find X8 Pro 5G वर तगडा Discount, थेट 9,999 रुपयांची भारी सूट

Daiwa Smart TV

वर सांगितल्याप्रमाणे, 43 इंच Daiwa Smart TV वर सध्या ऑफर्स सुरु आहेत. Daiwa 43 inch Full HD LED Smart Linux TV 2024 Edition सध्या Flipkart वर स्वस्तात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्ट टीव्ही 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु सध्या तो केवळ 11,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांवर 10% सूट देखील मिळेल.

या सवलतीनंतर या टीव्हीच्या किंमतीवर 1200 रुपयांची ऑफ असेल, त्यानंतर त्याची किंमत केवळ 10,799 रुपयांपर्यंत येईल. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Daiwa Smart TV चे फीचर्स

या Daiwa स्मार्ट टीव्हीमध्ये 43 इंच लांबीची फुल HD स्क्रीन आहे. यात अगदी स्लिम बेझल्ससह एज-टू-एज डिझाइन आहे. या टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेट आणि 16.7 दशलक्ष कलर सपोर्ट आहे. तसेच, विविध प्रकारचे कंटेंट पाहण्यासाठी या टीव्हीमध्ये मुव्हीज, गेम, स्पोर्ट्स असे सात पिक्चर मोड आहेत. हे टीव्ही दोन बॉक्स स्पीकरसह येतात, जे एकूण 20W ऑडिओ आउटपुट प्रदान करतात. विशेष म्हणजे या टीव्हीमध्ये वातावरण आणि मूडनुसार गाणी/ऑडिओ ऐकण्यासाठी संगीत, चित्रपट, खेळ इ. 5 साउंड मोड आहेत.

flipkart big discount on daiwa 43 inch QLED Smart Tv

चांगल्या परफॉर्मन्ससाठी या टीव्हीमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर आहे, जो स्मूथ मल्टीटास्किंग करतो. या टीव्हीमध्ये 512MB रॅमसह ॲप्स डाउनलोड आणि स्टोअर करण्यासाठी 4GB स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात इनबिल्ट Wi-Fi आहे. त्याबरोबरच, Daiwa स्मार्ट टीव्ही प्री-लोडेड OTT ॲप्स जसे प्राइम व्हिडिओ, Sony LIV, Zee5 आणि YouTube सह येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये मोबाईल फोनचा कंटेंट टीव्हीवर पाहण्यासाठी मिराकास्ट आणि Apple Airplay सपोर्ट देखील आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo