भारीच की! Mi Smart TV वर बंपर डिस्काउंट, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

भारीच की! Mi Smart TV वर बंपर डिस्काउंट, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर Mi TV Days सेल सुरू

Mi Smart TV वर भारी सवलत

निम्म्यापेक्षाही कमी किमतीत खरेदी करा TV

तुमच्यासाठी स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Mi TV Days सेल सुरू आहे. या काळात तुम्हाला Xiaomiचे स्मार्ट TV अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील. या स्मार्ट टीव्हीवर 55% पर्यंत सूट दिली जात आहे. चला तर जाणून घेऊयात सेलमधील 5 सर्वोत्तम डील्सबद्दल… 

1. Xiaomi 5A 32 inch 

  Xiaomiचा हा स्मार्ट TV 38% डिस्काउंटनंतर 15,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 32-इंच डिस्प्ले असलेल्या या TVमध्ये बेझल-लेस मेटल बॉडी आणि HD रेडी रेझोल्यूशन आहे. उत्तम आवाजासाठी टीव्हीमध्ये 20W स्पीकर आउटपुट देण्यात आला आहे. यात 1 GB रॅमसह 8 GB स्टोरेज आणि गुगल असिस्टंट सपोर्ट आहे. येथून खरेदी करा…

 हे सुद्धा वाचा : REALMEचा नवीन 5G फोन लाँच, 5000mAh बॅटरीसह मिळेल 6.5 इंच डिस्प्ले

2. Xiaomi 5X 43 inch 

Xiaomiचा हा स्मार्ट टीव्ही 38% डिस्काउंटनंतर 30,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिझनी + हॉटस्टार आणि यूट्यूब सारखे ऍप्स टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत. यात 60Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आणि 30W साउंड आउटपुट आहे. याशिवाय बेझल-लेस डिझाइन, डॉल्बी व्हिजन, गुगल असिस्टंट सपोर्ट आणि क्वाड कोअर प्रोसेसर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. येथून खरेदी करा…
 

3. Xiaomi 4X 55 inch TV 

Xiaomi चा हा स्मार्ट टीव्ही 30% सवलतीसह 34,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. टीव्हीची स्क्रीन साइज 55 इंच आहे. टीव्हीमध्ये 4K HDR डिस्प्ले आणि 20W स्पीकर आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिझनी + हॉटस्टार आणि यूट्यूब सारखे ऍप्स टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल केलेले आहेत. येथून खरेदी करा…

4. Xiaomi OLED vision 55 inch TV 

या मॉडेलवर कमाल 55% सूट उपलब्ध आहे. TVची किंमत 1,99,999 रुपये आहे, जी सवलतीनंतर 89,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा TV 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आणि 30W स्पीकर आउटपुटसह येतो. येथून खरेदी करा…

5. Xiaomi Mi Q1 75 inch TV 

32% डिस्काउंटनंतर या TVची किंमत 1,34,999 रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला HDR10+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह उत्तम व्यूइंग एक्सपेरियंस देतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि स्पीकर 30W साउंड आउटपुटसह येतो. 75 इंच लांबीच्या या टीव्हीमुळे तुम्हाला घरात सिनेमा हॉलसारखा अनुभव येईल. येथून खरेदी करा…

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo