AKAI : मॅजिक रिमोट आणि व्हॉइस कंट्रोलसह परवडणारा 4K स्मार्ट टीव्ही, मिळेल थिएटर सारखा साउंड

AKAI : मॅजिक रिमोट आणि व्हॉइस कंट्रोलसह परवडणारा 4K स्मार्ट टीव्ही, मिळेल थिएटर सारखा साउंड
HIGHLIGHTS

AKAI ने भारतात 4K स्मार्ट टीव्हीची नवीन रेंज लाँच केली

नवीन टीव्ही 32, 43, 50 आणि 55 इंच साईजमध्ये उपलब्ध

नवीन TVमध्ये नेटफ्लिक्स, झी5, सोनी लिव्ह इ. OTT ऍप्स प्री- इंस्टॉल

AKAI ने भारतीय वापरकर्त्यांसाठी 4K स्मार्ट टीव्हीची नवीन रेंज लाँच केली आहे. कंपनीचे हे नवीन टीव्ही 32, 43, 50 आणि 55 इंच साईजमध्ये आहेत. WebOS वर काम करणाऱ्या या TV मध्ये कंपनी HD ते 4K रिझोल्युशन ऑफर करत आहे. त्यांच्याकडे बिल्ट-इन अलेक्सा सपोर्ट आणि डॉल्बी ऑडिओ देखील आहेत. लाँच केलेल्या या टीव्हीसोबत तुम्हाला एक मॅजिक रिमोट देखील मिळेल. 

हे सुद्धा वाचा : Voter ID Card सोबत Aadhar कार्ड लिंक करण्याचा सर्वात सोपा मार्ग, घरबसल्या होणार काम

किंमत : 

अकाईच्या नवीन टीव्हीची प्राइसिंग खूपच आकर्षक आहे. तुम्ही 55-इंच लांबीचा 4K अल्ट्रा HD टीव्ही 39,990 रुपयांना खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे कंपनी हे TV 3,999 रुपयांच्या EMI वर खरेदी करण्याची संधी देखील देत आहे. अकाईने EMIसाठी बजाज फायनान्स, पिनलेब्स आणि कोटक यांच्यासोबत भागीदारी केली आहे.

जबरदस्त फीचर्स : 

नवीन टीव्हीमध्ये प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, झी5, सोनी लिव्ह, हॉटस्टार आणि ऍपल टीव्ही सारख्या OTT ऍप्स प्री-इंस्टॉल केलेले आहेत. 4K अपस्केलिंग आणि HDR 10 HLG टीव्हीमध्ये उत्कृष्ट व्युइंग एक्सपेरियन्ससाठी ऑफर केले जात आहे. त्याचबरोबर, घरच्या घरी सिनेमा हॉलची अनुभूती देण्यासाठी टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ देखील उपस्थित आहे.

वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला ड्युअल बँड Wi-Fi, 2-वे ब्लूटूथ 5.0 आणि स्क्रीन मिररिंग फिचर मिळेल. हे टीव्ही 1.5 GB रॅम आणि 8 GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहेत. Thinq AI सपोर्ट आणि बेझल-लेस डिझाइन उपकरण अधिक प्रीमियम बनवते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo