भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम दिग्गज Vodafone Idea आपल्या नव्या आणि आकर्षक प्लॅन्समुळे नेहमीच बातम्यांमध्ये असते. कंपनी आपला यूजरबेस वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रीपेड प्लॅन्स समाविष्ट करत असते. कंपनीच्या प्लॅन्समध्ये असे काही बेनिफिट्सदेखील आहेत, जे इतर टेलिकॉम कंपन्या देत नाही. यापैकी अनेक प्लॅन्समध्ये मनोरंजनासाठी लोकप्रिय OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे. जर तुम्हीही स्वतःसाठी असाच प्रीपेड पॅक शोधत असाल, या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी विशेष VI प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
Vodafone Idea विशेष प्लॅन
Vodafone Idea च्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 408 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटा दिला जाणार आहे. तसेच, अखंडितपणे कॉलिंगसाठी, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा देण्यात आली आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये 100SMS ची सुविधा देखील उपलब्ध आहेत.
एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारखे बेनिफिट्स देखील दिले जाणार आहेत. याशिवाय, या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी SonyLiv सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जवळपास समान बेनिफिट्ससह येणारा VI प्लॅन
वरील 408 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, VI कडे 469 रुपयांच्या आणखी एक प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये देखील दररोज 2.5GB डेटा आणि 100SMS दिले जातात. अखंडित कॉलिंगसाठी यामध्ये देखील अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारख्या सुविधा सुद्धा दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे हा प्लॅन Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह येतो.
Vodafone Idea चा नवीन प्लॅन
Vodafone Idea ने अलीकडेच एक नवा प्लॅनदेखील जाहीर केला आहे. होय, VI ने मागील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये RedX पोस्टपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत 1,201 रुपये प्रति महिना इतकी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 3000SMS, Netflix, Amazon Prime आणि Hotstar चा ॲक्सेस दिला जात आहे. यामध्ये हाय स्पीड डेटा सुद्धा उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile