भारतातील तिसरी सर्वात मोठी Telecom दिग्गज Vodafone Idea ने युजर्ससाठी एक नवीन ऑफर सादर केली आहे. युजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच काही ना काही ऑफर्स सादर करत असते. या लाईनअपमध्ये VI आपल्या तीन लोकप्रिय प्लॅनमध्ये एक्सट्रा बोनस डेटा ऑफर करत आहे. हे प्लॅन 349 रुपये, 579 रुपये आणि 859 रुपयांचे आहेत. या तिन्ही प्लॅनच्या रिचार्जवर कंपनी यूजर्सला 5GB बोनस डेटा देत आहे. लक्षात घ्या की, ही ऑफर 3 दिवसांपर्यंत उपलब्ध असेल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या ऑफर अंतर्गत उपलब्ध असलेला 5GB डेटा तुम्ही फक्त 3 दिवसांसाठी वापरू शकता. तसेच, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला Vodafone Idea वेबसाइट आणि ॲपवरून रिचार्ज करावे लागेल.
Vodafone Idea चा 349 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 फ्री SMS ची सुविधा आहे. आता या प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 3 दिवसांसाठी 5GB बोनस डेटा देत आहे.
549 रुपयांचा प्लॅन
Vi च्या 549 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला जवळपास दोन महिने म्हणजेच 56 दिवसांची वैधता मिळते. डेटा वापरासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 दिवसांसाठी 5GB बोनस डेटा मिळणार आहे.
849 रुपयांचा प्लॅन
Vi चा 849 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा वापरासाठी मिळणार आहे. तर, यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 3 दिवसांसाठी 5GB बोनस डेटा मिळणार आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे तिन्ही प्लॅन Vi Hero अनलिमिटेड बेनिफिट्ससह येतात. ज्यामध्ये यूजर्सना रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत अमर्यादित नाईट डेटा बेनिफिट मिळतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile