Vodafone Idea (Vi) कंपनी ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. तुमच्या देखील लक्षात आले असेक की, VI आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे विशेष प्लॅन आणते, जेणेकरून अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करता येईल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
जर तुम्ही Vi वापरकर्ता असाल आणि दीर्घ वैधतेसह नवीन योजना शोधत असाल, तर कंपनीकडे तुमच्यासाठी अनेक उत्तम पर्याय आहे. VI आपल्या ग्राहकांसाठी एक 250 दिवसांच्या वैधतेसह एक प्लॅन ऑफर करते. इतर कंपन्या त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांनंतर 365 दिवसांची वैधता देतात. मात्र, VI कडे वापरकर्त्यांसाठी 250 दिवसांच्या वैधतेसह खास प्लॅन आहे. चला तर मग बघुयात प्लॅनची किंमत आणि अप्रतिम बेनिफिट्स.
Vodafone Idea (Vi) कंपनीच्या 250 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल बोलायचे तर त्याची किंमत 1,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 250 दिवसांची दीर्घ वैधता दिली जाते. Vi च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे दिले जात आहेत. प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1.5GB डेटा दिला जातो. 250 दिवसांच्या वैधतेनुसार वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकूण 375GB डेटाचा प्रवेश मिळतो. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो.
तसेच, यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 100 मोफत SMS ची सुविधा मिळते. त्याबरोबरच, हा प्लॅन नाईट डेटा आणि वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधेसह येतो. वापरकर्त्यांना रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित नाईट डेटा पूर्णपणे मोफत मिळतो. वीकेंड डेटा रोलओव्हरबद्दल बोलायचे झाल्यास, यात शनिवार आणि रविवारी इतर दिवसांचा उरलेला डेटा वापरायला मिळेल. ही सुविधा केवळ VI कंपनी तुम्हाला देते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile