VI चे दोन नवीन प्लॅन्स लाँच ! कमी किमतीत डेली 2GB डेटासह OTT बेनिफिट्स उपलब्ध

HIGHLIGHTS

Vodafone-Idea चे दोन नवीन प्लॅन्स लाँच

नवीन प्लॅन्सची किमंत 368 आणि 369 रुपये आहे.

एका रुपयापेक्षा जास्त किमतीच्या प्लॅनमध्ये काय मिळेल विशेष

VI चे दोन नवीन प्लॅन्स लाँच ! कमी किमतीत डेली 2GB डेटासह OTT बेनिफिट्स उपलब्ध

दिग्गज टेलिकॉम कंपनी Vodafone-Idea सतत आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स सादर करत असते. कंपनीने कमी किमतीचे दोन नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. नवीन प्लॅन्सची किमंत 368 आणि 369 रुपये आहे. स्वस्त असूनही या प्लॅनमध्ये भारी फायदे मिळणार आहेत. यापूर्वी कंपनीने दोन म्हणेजच 129 रुपये आणि 298 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले होते.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Vodafone-Idea चा 368 रुपयांचा प्लॅन 

कंपनीचा हा नवा प्रीपेड पॅक 30 दिवसांची वैधता देतो. यामध्ये, ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2GB डेटा आणि 100SMS मिळतात. याशिवाय, सनएनएक्सटी ऍपच्या सबस्क्रिप्शनसह वीकेंड डेटा रोलओव्हर, बिन्ज ऑल नाईट, चित्रपट आणि लाइव्ह टीव्ही सारखे फायदे देखील प्लॅनमध्ये दिले जाणार आहेत.

Vodafone-Idea चा 369 रुपयांचा प्लॅन 

वरील प्लॅनपेक्षा कंपनीच्या या प्लॅनची किंमत एका रुपयापेक्षा जास्त ठेवली आहे. यामध्येही वरील प्लॅनप्रमाणे ग्राहकांना 30 दिवसांची वैधता मिळेल. यामध्येही ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2GB डेटा आणि 100SMS मिळतात.  त्याबरोबरच, डेटा डिलाइट्स, बिंज ऑल नाईट, डेटा रोलओव्हर, चित्रपट आणि लाइव्ह टीव्हीचा ऍक्सेस दिला जात आहे. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये SONY लिव्हचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळणार आहे. 

Vodafone-Idea ची 5G सर्व्हिस 

VI कंपनी गेल्या काही दिवसांपासून सतत बातम्यांमध्ये आहे. कधी 5G सर्व्हिसच्या लॉन्चिंगबद्दल, कधी नवीन प्लॅन्सच्या लॉन्चिंगबद्दल किंवा प्लॅन्समध्ये बदल करण्याबद्दल बातम्यांमध्ये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाने नुकतीच 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासाठी कंपनीने स्मार्टफोन दिग्गज Xiaomi आणि Motorola यांच्याशी पार्टनरशिप केली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo