VI : ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये 5GB डेटा मिळतोय मोफत, अप्रतिम ऑफर

HIGHLIGHTS

VI ची महा रिचार्ज स्कीम

299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे रिचार्ज केल्यास 5GB डेटा मोफत

ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.

VI : ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये 5GB डेटा मिळतोय मोफत, अप्रतिम ऑफर

प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Vodafone-idea ने आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम ऑफर आणली आहे. कंपनीने 'महा रिचार्ज स्कीम' नावाची नवीन ऑफर लाँच केली आहे. या अंतर्गत, वापरकर्त्यांना 299 रुपये आणि त्याहून अधिकच्या रिचार्ज प्लॅन्सवर 5GB डेटा मोफत दिला जाईल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

VI ची महा रिचार्ज स्कीम

 महा रिचार्ज प्लॅनअंतर्गत 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे रिचार्ज केल्यास 5GB डेटा मोफत मिळेल, जो 3 दिवसांसाठी वापरता येईल. तसेच, 199 ते 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये रिचार्ज केल्यावर 2GB डेटा दिला जाईल. हा देखील तुम्हाला तीन दिवसांसाठी मिळणार आहे.

एवढेच नाही तर फ्री डेटा व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना इतरही बेनिफिट्स मिळणार आहेत. रिचार्ज प्लॅनसह Vi Movies, Live TV, Music आणि Games सारखे फायदे देखील मिळतील. पण एक लक्षात घ्या की, ही ऑफर केवळ VI  च्या अधिकृत ऍपवरून प्रीपेड प्लॅन्स रिचार्ज केल्यासच मिळेल.

अलीकडेच बंद झालेला प्लॅन्स 

Vi ने डेटा ऑफर सादर करण्यापूर्वी त्याच्या प्लॅटफॉर्मवरून काही प्लॅन्स हटवले आहेत. 549 रुपयांचा प्रीपेड प्लॅन कंपनीने काढून टाकला. हा प्लॅन नुकताच लाँच झाला होता. या प्लॅनची वैधता 180 दिवसांची होती आणि दररोज 1GB डेटा दिला जात होता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo