भारतातील टॉप टेलिकॉम कंपन्यांमधून एक Vodafone Idea ने एक नवा वार्षिक प्लॅन लाँच केला आहे. VI सतत आपल्या युजर्ससाठी नवनवीन प्लॅन्स सादर करत असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवा वार्षिक प्लॅन किफायशीर असण्यासोबत अनेक जबरदस्त फायदे देतो. एवढेच नव्हे तर या प्लॅनसह तुम्हाला आकर्षक OTT सबस्क्रीप्शन देखील मिळणार आहे. जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स-
हा लॉन्ग टर्म प्लॅन Vodafone Idea ने प्रीपेड वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटी आणि मनोरंजनाचे एक उत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. Vodafone Idea च्या नव्या प्लॅनची किंमत 3,199 रुपये आहे. VI ही एकमेव दूरसंचार कंपनी आहे, जी 3,199 रुपयांच्या सर्वात कमी दर श्रेणीतील ऍन्युअल प्लॅनमध्ये सर्वाधिक लाभ देत आहे.
VI चा 3199 रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा हा प्लॅन ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि दररोज 2GB डेटा ऑफर करतो. यामध्ये राष्ट्रीय कॉल, दररोज 100 SMS, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोफत बिंज यासारखे अतिरिक्त फायदे देखील समाविष्ट आहेत. लक्षात घ्या की, Vodafone Idea वापरकर्ते Vi App किंवा वेबसाइटवरून 3,199 रुपयांचा नवीन प्लॅन ऑनलाईन रिचार्ज करू शकतात.
तसेच, प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनासाठी OTT बनिफिट्सदेखील उपलब्ध आहेत. Amazon Prime Video Mobile Edition चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. हा विशेष OTT लाभ हे सुनिश्चित करतो की, प्रीपेड वापरकर्ते यात लेटेस्ट चित्रपट, टीव्ही शो आणि Amazon Originals यांसारख्या मनोरंजन कंटेंटचा सतत आनंद घेऊ शकतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile